विद्यार्थ्यांसाठी पायपीट
By Admin | Updated: June 25, 2014 00:38 IST2014-06-25T00:21:52+5:302014-06-25T00:38:06+5:30
कंधार : प्रवेश प्रक्रिया गतिमान झाली आहे़ शाळा- महाविद्यालय व स्वत:चा कार्यभार पूर्ण व्हावा, यासाठी शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी शहरासह ग्रामीण भागात मोठी पायपीट होत असल्याचे चित्र समोर आले आहे़
विद्यार्थ्यांसाठी पायपीट
कंधार : प्रवेश प्रक्रिया गतिमान झाली आहे़ शाळा- महाविद्यालय व स्वत:चा कार्यभार पूर्ण व्हावा, यासाठी शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी शहरासह ग्रामीण भागात मोठी पायपीट होत असल्याचे चित्र समोर आले आहे़
दहावी व बारावी बोर्डाचे निकाल लागले़ शासनमान्य खाजगी शिक्षण संस्थेचा निकाल वरचढ राहिला़ विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत आपली चुणूक दाखवली़ बारावी बोर्डात मुलींचा उत्तीर्णमध्ये टक्का वाढला़ शालांत परीक्षेचा निकालही चांगला लागला़ बारावी परीक्षेत मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ९०़३० तर मुलांचे प्रमाण ८७़८९ टक्के होते़ एकूण निकाल ८८़६४ टक्के लागला़ दहावी परीक्षेचा सरासरी निकाल ७३़९९ टक्के लागला़ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाचे, उज्ज्वल यश परंपरेचे, आपल्या येथील खास अध्यापन वैशिष्ट्यांचा गवगवा करण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही़
आमच्या शाळेत असलेल्या शैक्षणिक सोयी-सुविधा, गुणवत्ता वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न विद्यार्थ्यांकडे दिले जाणारे विशेष शैक्षणिक लक्ष, समस्यांवर मात करण्याचा होणारा प्रयत्न, उपलब्ध भौतिक सुविधा, कला, सांस्कृतिक, क्रीडा नैपुण्यासाठी प्रयत्न आदी पालकावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि विद्यार्थ्यांना जिभेवर साखर टाकल्यासारखे बोलले जात आहे़ पहिली, पाचवी, आठवी, अकरावी व पदवी स्तरावरील प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी गुरुजींनी मोठा आटापिटा चालविला आहे़ गावे-वाडीतांडे आडमार्गाला आहेत़ तरीही त्याला (गावाला) गाठण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जात नाही़(वार्ताहर)
गुणवंतांचा सत्कार
नांदेड : राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा नांदेडच्या वतीने समाजातील दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कार १३ जुलै रोजी गुरू रविदास महाराज मंदिर शिवनगर येथे होणार आहे़ ज्या विद्यार्थ्याला ८० टक्केच्यावर गुण मिळाले अशांनी गुणपत्रिकेसह संपर्क साधावा असे शहराध्यक्ष शिवानंद जोगदंड यांनी सांगितले़(वार्ताहर)
शालांत परीक्षेत जि़प़ (मुलींचे) शाळा, कंधारचा निकाल शून्य टक्के लागला़ बारावी परीक्षेतील मुलींची यशस्वी भरारी असताना जि़प़ मुलींच्या शाळेच्या निकालाने अंतर्मुख करण्यास भाग पाडले़ तरीही नव्या उमेदीने सर्व शाळांतील शिक्षकांनी आपल्या शाळेत प्रवेशासाठी कंबर कसली आहे़ त्यासाठी गल्लीत, गावो-गाव शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत़