आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे
By Admin | Updated: July 10, 2014 00:48 IST2014-07-10T00:00:08+5:302014-07-10T00:48:57+5:30
हिंगोली : तालुक्यातील कलगाव येथील शेतकऱ्यांनी गारपिटीचे अर्थसहाय्य मिळावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.
आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे
हिंगोली : तालुक्यातील कलगाव येथील शेतकऱ्यांनी गारपिटीचे अर्थसहाय्य मिळावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या बाबत आ. भाऊराव पाटील व तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी आश्वासन दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
कलगाव येथील शेतकऱ्यांचे गेल्या हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचा सर्वे तलाठी के. एन. पोटे व कृषी सहाय्यक डी. एन. राठोड यांनी योग्य तो केला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे सर्वपात्र शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य देण्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळपासून येथील ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास आ. भाऊराव पाटील गोरेगावकर व तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी उपोषणार्थींशी चर्चा केली व कोणावरही अन्याय होवू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. उपोषणकर्क्यांमध्ये सिद्धार्थ वाघमारे, वसंतराव पौळ, बाळासाहेब हारनोळ, नानाराव पौळ, माधव घुमनर, किसन वाघमारे, लक्ष्मण पौळ, प्रकाश पौळ आदींनी सहभाग नोंदविला. (जिल्हा प्रतिनिधी)