पक्ष्यांसाठी ७०० ठिकाणी चारा-पाणी
By Admin | Updated: May 14, 2017 00:43 IST2017-05-14T00:41:15+5:302017-05-14T00:43:28+5:30
उस्मानाबाद :दृष्टी फाउंडेशन व निसर्ग मित्र यांच्या वतीने ७ ते १२ मे या कालावधीत शहरात पक्ष्यांसाठी ‘ओंजळभर पाणी, मुठभर धान्य’ हा उपक्रम राबविण्यात आला.

पक्ष्यांसाठी ७०० ठिकाणी चारा-पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : उन्हाळ्यात पक्ष्यांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी दृष्टी फाउंडेशन व निसर्ग मित्र यांच्या वतीने ७ ते १२ मे या कालावधीत शहरात पक्ष्यांसाठी ‘ओंजळभर पाणी, मुठभर धान्य’ हा उपक्रम राबविण्यात आला.
उस्मानाबाद शहरातील एस.टी.कॉलनी, आदर्श कॉलनी, जिजाऊ नगर, माणिक चौक, शाहू नगर, संभाजी नगर, बँक कॉलनी, पोस्ट कॉलनी, रामनगर, तांबरी विभाग, हातलादेवी परिसरात जवळपास सातशे ठिकाणी पक्ष्यांसाठी धान्य-पाण्याची सोय केली आहे. दररोज सकाळी ६ वाजता साधारणपणे ४० ते ५० निसर्ग मित्र याकामी परिश्रम घेत होते. केवळ फक्त धान्य-पाण्याची सोय न करता त्या-त्या परिसरातील सर्व नागरिकांना उपक्रमामध्ये सहभागी करुन पक्षी संवर्धनाविषयी जागृती करून पालकत्व दिले गेले.
सदर उपक्रम राबविण्यााठी प्रा. मनोज डोलारे, विवेक कापसे, खंडू राऊत, नेताजी राठोड, सोमनाथ लांडगे, प्रदीप गोरे, संकल्प पडवळ, शैलेश वाघ, प्रतिक चंदनशिवे, संकेत सुर्यवंशी, विजय पवार, संदीप देशमुख, अंकुर देशमुख, जयराज खोचरे, विवेक पाटील, राहूल बुरसे, अभिजीत व्हटकर, गणेश सुत्रावे, नितीन देशमुख, संदीप साळुंके, संकल्प फाटक, गोपाळ आचार्य आदींनी परिश्रम घेतले.