शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

शेतमजूराच्या मुलीस दिल्लीचे बोलावणे; प्रजासत्ताक दिन संचलन अन् 'परीक्षा पे चर्चा' चे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 1:10 PM

बासरीवादक राधिकाला दिल्लीचा बुलावा; दिल्लीत दोन महत्वाच्या कार्यक्रमात लावणार उपस्थिती

- शब्बीर शेखदेगलूर: राष्ट्रीय कला महोत्सवात बासरी वादनात भारतातून प्रथम क्रमांक पटकावत होट्टल येथील राधिका सुवर्णकार हिने देगलूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. आता तिला दिल्ली येथे होणाऱ्या परीक्षा पे चर्चा आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याचे पत्र मिळाले आहे. दि. 24 ते 29 जानेवारी दरम्यान ती दिल्लीत दोन्ही कार्यकर्मात सहभागी असेल याबाबतचे एक पत्र नुकतेच राधिका शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयास प्राप्त झाले आहे. 

केंद्र शासनाकडून दिल्लीत 'परीक्षा पे चर्चा ' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात राधिकाचा सहभाग राहणार आहे. सोबतच 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या संचलनाच्या कार्यक्रमातही राधिका सुवर्णकारचा विशेष सहभाग राहणार आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या पत्रानुसार शिक्षणाधिकारी नांदेड यांनी 19 जानेवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या नावे पत्र देऊन कळविले आहे. यानुसार आज राधिका आपल्या काकासोबत दिल्लीकडे रवाना झाली आहे.

शेत मजूराच्या मुलीची भरारी शहरातील श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावी वर्गात शिकत असलेल्या राधिका सुवर्णकार या विद्यार्थिनीने नुकतेच 9 ते 12 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कला उत्सव या राष्ट्रीय स्पर्धेत बासरी वादन या कला प्रकारातून सहभाग घेतला. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राधिकाने यशाला गवसणी घालीत भारतातून प्रथम क्रमांक पटकावला. या यशाची दखल घेत केंद्र शासनाने नवी दिल्ली येथे 24 ते 29 जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांत राधिकास आमंत्रित केले आहे. एका शेत मजुराच्या मुलीने उत्तुंग भरारी घेत ग्रामीण भागातील होट्टल ते दिल्ली असा प्रवास थक्क करणारा आहे. राधिकाचे हे यश ग्रामीण भागातील कलावंतांना नक्कीच प्रेरणादायी देणारे ठरत आहे.

टॅग्स :NandedनांदेडNew Delhiनवी दिल्लीRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४