फुले,फळे अन् भाज्याही महागल्या
By Admin | Updated: September 4, 2014 00:20 IST2014-09-04T00:04:23+5:302014-09-04T00:20:42+5:30
यशवंत परांडकर, नांदेड नांदेड : पूर्वा नक्षत्र प्रारंभ झाल्यापासून पाऊस सुरू आहे़ त्यामुळे अनेकांनी गौरी आवाहनाला म्हणजे मंगळवारीच बाजार उरकून घेतला.

फुले,फळे अन् भाज्याही महागल्या
यशवंत परांडकर, नांदेड
नांदेड : पूर्वा नक्षत्र प्रारंभ झाल्यापासून पाऊस सुरू आहे़ त्यामुळे अनेकांनी गौरी आवाहनाला म्हणजे मंगळवारीच बाजार उरकून घेतला. गौरी पूजनाच्या दिवशी अनासायास बुधवारचा बाजार असल्याने आणि पावसाने उघडीप दिल्याने बाजारपेठेत गर्दी दिसत होती़
आदिमाता, आदिशक्ती महालक्ष्मी पूजेच्या साहित्यांपासून सजावट तसेच भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड उडाली होती़ मंगळवारी रात्री महालक्ष्मीची विधिवत प्रतिष्ठापणा करण्यात आली़ त्यात केळीची पाने, नागेलीची पाने, कमळ, मक्याचे कणीस, काकडी, भेंडी, भोपळा, बीट, चवळीच्या शेंगा, गवार, वालच्या शेंगा, गवार शेंगा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, शेवगा, भोपळा, कद्दू, फूलकोबी, पानकोबी, वांगी, कडीपत्ता, पुदिना, लिंबू, मिरची, तोंडले, कार्ले, सफरचंद, मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले होते. यंदा भाजीपाल्याचे दर थोड्याफार प्रमाणात कडाडल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत होती. पण पूजेसाठी आवश्यक असल्यामुळे प्रत्येक जण उत्साहाने खरेदी करीत असल्याचे चित्र होते. सजावटीच्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हारांनी लक्ष वेधून घेतले होते. साधारणत: ३० ते ३५ रुपये डझनप्रमाणे केळी विक्री झाल्याचे श्रीनगर भागातील केळी विक्रेते संग्राम कांबळे यांनी सांगितले. पूजेच्या साहित्यामध्ये, नागेलीची पाने, सुपारी, नारळ, हळद, कुंकू, बताशे, बदाम, खरीक, हाळकूंड,फुलवाती, निरंजन, महालक्ष्मीचे वस्त्र आदींची खरेदी करण्यासाठी नागरिकांची वर्दळ दिसून आली. पूजेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या फुलांना मोठी मागणी दिसून आली. साधारणत: दीडशे ते पाच हजार रुपयांपर्यंतचे हार विक्रीसाठी उपलब्ध होते. फुलांमध्ये शेवंती ३०० रुपये किलो, , पिवळा झेंडू १०० रुपये, गुलाब २०० रुपये किलो असल्याची माहिती फूलविक्रेते अब्दुल अलीम खान यांनी दिली.