उड्डाण पुलावरील दिवे शॉर्ट
By Admin | Updated: May 7, 2014 00:22 IST2014-05-07T00:21:54+5:302014-05-07T00:22:14+5:30
औरंगाबाद : महापालिकेने औरंगाबादकरांच्या जिवाला धोका निर्माण करणारे पथदिवे सेव्हन हिल उड्डाण पुलावर बसविले असून ५० टक्के दिवे शॉर्ट झाले आहेत.

उड्डाण पुलावरील दिवे शॉर्ट
औरंगाबाद : महापालिकेने औरंगाबादकरांच्या जिवाला धोका निर्माण करणारे पथदिवे सेव्हन हिल उड्डाण पुलावर बसविले असून ५० टक्के दिवे शॉर्ट झाले आहेत. पावसामुळे एलईडी बल्ब शॉर्ट झाल्याचा दावा विद्युत विभाग करीत आहे. पुलावरील सर्व बल्बचा प्रकाश कमी झाला आहे. बँ्रडेड कंपनीच्या बल्बऐवजी निकृष्ट दर्जाचे बल्ब बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या वादात दीड वर्ष पूल अंधारात राहिल्याने पुलावर लहान-मोठे अपघात झाले. अखेर मनपाने पुलावर पथदिवे बसविण्याची जबाबदारी जानेवारी २०१२ मध्ये घेतली. बांधकाम विभागाने बसविलेले ८० पथदिवे पालिकेने काढून टाकले; मात्र नवीन पथदिवे बसविण्यासाठी सव्वा वर्ष लावले. ५० लाख रुपयांच्या खर्चातून पथदिवे बसविण्यास मुहूर्त लागला. जानेवारी २०१३ मध्ये खांब बसविण्याचे काम सुरू झाले. मजबूत असा आधार न देता ते खांब बसविण्यात आले आहेत. तांत्रिक त्रुटी ६० पथदिवे उड्डाण पुलावर बसविले आहेत. प्रत्येक खांबाचे वजन ५० किलो इतके आहे. तीन क्लॅम, चार इंची आकाराचे सहा नट व अर्धा इंची जाडीच्या लोखंडी बॉक्स पॅलेटमध्ये तो खांब बसवून त्यावर दिवा लावण्यात आला आहे. खांबांची अलाईनमेंट केलेली नाही. ते खांब फायबर रिपोर्सपासून बनविले आहेत. बल्ब-खांबांना दोन वर्षे काहीही होणार नाही, असा दावा मनपाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी केला होता. कामावर ५० लाखांचा खर्च झाला आहे. बजाज या मूळ कंत्राटदाराने लोकल कंत्राटदाराकडून काम करून घेतले आहे. खांब एअरपॅक असून, त्यामध्ये पाणी जाण्यास वाव नाही. त्यामुळे ते गंजून पडण्याची सुतराम शक्यता नाही, असाही दावा त्यांनी केला होता.