जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

By Admin | Updated: August 17, 2014 00:09 IST2014-08-17T00:09:05+5:302014-08-17T00:09:05+5:30

परभणी : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री सुरेश धस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

The flag meeting of the Guardian's Office in the Collectorate | जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

परभणी : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री सुरेश धस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास आ.बाबाजानी दुर्राणी, आ.मीराताई रेंगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई बुधवंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समशेर वरपूडकर, जिल्हाधिकारी एस.पी. सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक अनंतराव रोकडे, मनपा आयुक्त अभय महाजन, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. डुंबरे, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी झावरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, होमगार्डचे जिल्हा समादेशक डॉ. संजय टाकळकर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते. पालकमंत्री धस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यानंतर राज्यमंत्री धस यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेतली. सूत्रसंचालन नितीन कारखानीस यांनी केले़
प्रशासकीय इमारत
प्रशासकीय इमारतीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी संभाजी झावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले़ याप्रसंगी मुद्रांक जिल्हाधिकारी एस़ के़ बोधगिरे, ग्राहक मंचचे अध्यक्ष पी़ पी़ निटुरकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ़ पी़एम़ कांबळे, शिक्षणाधिकारी निरंतर ए़बी़ गरुड, जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख विग़़ शिरोळकर, उपाअधीक्षक भूमीअभिलेख प्रिया पाटील, कार्यकारी अभियंता निवडंगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: The flag meeting of the Guardian's Office in the Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.