विविध मागण्यांसाठी बचत गटांच्या महिलांचा ठिय्या
By Admin | Updated: March 12, 2017 23:24 IST2017-03-12T23:22:34+5:302017-03-12T23:24:35+5:30
केदारखेडा : येथील २१ बचतगटांच्या महिलांनी रविवारी भोकरदन येथे आ़ संतोष दानवे याच्ंया कार्यालयासमोर ठिय्या मांडला.

विविध मागण्यांसाठी बचत गटांच्या महिलांचा ठिय्या
केदारखेडा : येथील २१ बचतगटांच्या महिलांनी रविवारी भोकरदन येथे आ़ संतोष दानवे याच्ंया कार्यालयासमोर ठिय्या मांडला. विविध समस्या सोडविण्यासाठी या महिलांनी आ़ दानवे यांची भेट घेतली़ त्यांना लेखी निवेदन सादर केले़
केदारखेडा येथे एकूण २१ महिला स्वयंसहाय्यता बचत गट आहे़ या बचतगटांत एकूण दोनशेपेक्षा अधिक महिलांचा समावेश आहे. अत्यंत पारदर्शक पध्दतीने या गटांचा कारभार सुरु आहे़ परंतु संबंधित बचत गटांच्या महिलांना गटांसदर्भातील चर्चा, बैठका, हिशेब बैठका, सास्कृंतिक कार्यक्रम आदी कामासाठी स्वतंत्र खोली नाही़ शिवाय सुरक्षित जागा नसल्याने या महिलांनी आ़संतोष दानवे यांच्या निवसास्थानी ठिय्या मांडला़ यानंतर आ़ दानवे यांची भेट घेऊन सदरील मागणीचे निवेदन दिले़ गावात पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करावी, कायमस्वरुपी गावाचा पाणी प्रश्न निकाली निघावा यासाठी मुखयमंत्री पेयजल योजना द्यावी. यावर आ़ संतोष दानवे यांनी बचत गटांचा व्याप पाहता आपले संघटन पाहून आपल्या समस्या निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी जि़प़सदस्य डॉ़चंद्रकांत साबळे, बाबासाहेब मुरकुटे, भाऊसाहेब जाधव, रंजना जाधव, यमुना जाधव, कल्पना जाधव, नंदा जाधव, सुनीता जाधव, रत्नकला जाधव, हसनुरबी पठाण, वच्छला जाधव, अशामती जाधव, सरस्वती टेहरके, छाया सावंत, दीक्षा वाघ, आरती काबंळे, सुरेखा बसयै, पुर्णाबाई जाधव, अनिता लाचुर्ये, निमा पेरे, लक्ष्मी जाधव, सुंदरबाई तेटवार, रुखमनबाई पेरे, सुनीता पेरे, निला पंडित आदी उपस्थित होते.