दामदुप्पटचे आमिष दाखविणाऱ्या कंपन्यांचा सुळसुळाट
By Admin | Updated: July 18, 2014 01:50 IST2014-07-18T00:26:08+5:302014-07-18T01:50:11+5:30
जालना : कमी काळात दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून जनतेला लुटणाऱ्या कंपन्यांचा जालना जिल्ह्यात सुळसुळाट झाला

दामदुप्पटचे आमिष दाखविणाऱ्या कंपन्यांचा सुळसुळाट
जालना : कमी काळात दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून जनतेला लुटणाऱ्या कंपन्यांचा जालना जिल्ह्यात सुळसुळाट झाला असून अशा कंपन्यांविरुध्द कडक कारवाईची मागणी होत आहे.
मागील काही वर्षामध्ये योजना चालवणाऱ्या कंपन्यांचा सुळसुळाट वाढला आहे. जमिनी खरेदी-विक्री, विविध उत्पादने व परिवहन क्षेत्रात काम करीत असल्याचे भासवून शहर व आजूबाजूच्या खेड्यातील युवकांना ३० ते ४० टक्के कमिशन देऊन त्यांच्यामार्फत हा व्यवसाय चालविला जातो. त्यामुळे अनेक स्थानिक प्रतिनिधी यांना पाहून व कंपनी प्रलोभित योजनांमुळे पैसे गुंतवण्यास तयार होतात. केबीसी मल्टी ट्रेड प्रा.लि. नाशिक या कंपनीबाबत नाशिक पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर लोकांना सहा महिने किंवा एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे प्रलोभन दाखविले जात असल्याचे स्पष्ट झाले. या कंपनीने सामान्य जनताच नव्हे तर चाकरमाने, व्यवसायीक लोकांनाही गुंतवणूकीस भाग पाडलेले आहे. नाशिक पोलिसांनी मार्च २०१४ मध्ये कंपनीच्या कार्यालयावर छापा मारला असता त्यात बेकायदा व्यवहार मागील चार वर्षापासून संबंध महाराष्ट्रात प्रशासनाच्या नाकावर टिचून केले जात असल्याचे दिसून आले जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना लुबाडणाऱ्या अशा कंपन्यांविरुध्द कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने वैभव नालेगावकर, गणेश भगत, गणेश चांदोडे, भगवान चांदोडे, शिवलाल लोखंडे, सतीश कसबे, अनिल शिरगुळे, दीपक डिगे, राम मोरे, शाम सोनवणे, जगदीश जैवळ आदींनी केली आहे.