शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'मंत्रीपद फिक्स करा'; पाठींब्यासाठी राष्ट्रवादीचे आ. सोळंकेंची उपमुख्यमंत्री पवारांसमोर अट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 13:08 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीतील जास्तीतजास्त आमदारांना आपल्या गोटात घेण्याच्या प्रयत्नात

- पुरूषोत्तम करवामाजलगाव:  राज्यातील राजकीय भूकंपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीतील जास्तीतजास्त आमदारांना आपल्या गोटात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी माजलगावचे आ. प्रकाश सोळंके यांच्याशी देखील संपर्क केला. सोळंके यांनी कोणासोबत राहायचं याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, आ. सोळंके यांनी मंत्रीपद व येत्या विधानसभेसाठी उमेदवारी फिक्स करण्याची अट अजित पवारांसमोर ठेवणार असल्याची माहिती आ.सोळंकेंच्या गोटातून मिळाली आहे. 

पंधरा वर्षांपूर्वी अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून भाजपाला सोडचिठ्ठी देत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. सोळंके यांना राज्यमंत्रीपद देखील दिले. परंतु अडीच वर्षानंतर त्यांचे मंत्रीपद काढण्यात आले होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१९ साली आ. सोळंके पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. यावेळी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मंत्रिपद मिळावे यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देखील देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला संपर्क राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे रविवारी शिंदे - फडवणीस सरकारमध्ये सामील झाले. यावेळी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना मंत्री करण्यात आले. या दरम्यान, आमदार सोळंके छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्यस्त होते. निवडणुकीत त्यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर ते तात्काळ मुंबईला निघून गेले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी संपर्क केला असल्याचे बोलले जात आहे. परंतु आ. प्रकाश सोळंके यांनी अद्याप कोणासोबत जायचे हे ठरवल नाही. ते अजित पवार सोबत जाऊ शकतात असे राष्ट्रवादीच्या गोटातून बोलले जात आहे.

मंत्रीपद, पुढील तिकीटाची हमीया पार्श्वभूमीवर आज सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, आ. प्रकाश सोळंके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी अजित पवार यांना मंत्री पद, आगामी माजलगाव विधानसभेसाठी तिकीटाची हमी अशा अटी ठेवल्या आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री पवारांकडून कोणता शब्द मिळतो यावर आमदार सोळंके निर्णय जाहीर करतील, असेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Solankeप्रकाश सोळंकेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड