वीज पडून पाच महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 00:06 IST2017-06-13T00:05:51+5:302017-06-13T00:06:21+5:30
हिंगोली : जिल्ह्यात वीज पडून विविध घटनांमध्ये एकूण पाच महिला जखमी झाल्या असून दोन बैल ठार झाले आहेत

वीज पडून पाच महिला जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात वीज पडून विविध घटनांमध्ये एकूण पाच महिला जखमी झाल्या असून दोन बैल ठार झाले आहेत.
तीन महिला जखमी
जवळा बाजार : औंढा तालुक्यातील टाकळगव्हाण येथे सोमवारी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या अंगावर वीज पडून तीन महिला गंभीर जखमी झाल्या असून यामध्ये सासू-सून व अन्य एका महिलेचा समावेश आहे.
जवळा बाजारपासून ५ कि. मी. अंतरावर असलेल्या टाकळगव्हाण येथे सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास परिसरामध्ये वीजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस सुरू होता. यामध्ये घरच्या शेतात काम करणाऱ्या महिला पावसामुळे शेतातील उंबराच्या झाडाखाली थांबल्या असता त्या झाडावर वीज कोसळली. यामध्ये झाडाखाली असलेल्या रूख्मिणी ज्ञानोबा पावडे (वय ४९), अनुसया सीताराम पावडे (२७) या सासू-सून तर सुनीता बापूराव पावडे (२६, सर्व रा.टाकळगव्हाण) या गंभीर जखमी झाल्या. त्यांना जवळा येथील प्राथमिक उपचारानंतर परभणी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.