पाच वाहने एकमेकांवर आदळली
By Admin | Updated: November 18, 2015 00:37 IST2015-11-18T00:32:38+5:302015-11-18T00:37:41+5:30
पारगाव : मालवाहतूक ट्रकने अचानक ब्रेक मारले आणि एकामागून एक पाच वाहने एकमेकांवर आदळली़ या विचित्र अपघातात बसमधील प्रवाशांसह एकूण १५ जण जखमी झाले असून

पाच वाहने एकमेकांवर आदळली
पारगाव : मालवाहतूक ट्रकने अचानक ब्रेक मारले आणि एकामागून एक पाच वाहने एकमेकांवर आदळली़ या विचित्र अपघातात बसमधील प्रवाशांसह एकूण १५ जण जखमी झाले असून, पाच गंभीर जखमींना बीड येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते़ हा अपघात मंगळवारी सकाळी पारगाव (ता़वाशी) येथे घडला असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथून औरंगाबादकडे जाणारा मालट्रकच्या (क्ऱआऱजे़१९- जे़डी़६७३८) समोरील वाहनाने पारगाव नजीक अचानक ब्रेक मारले़ हा ट्रक पुढील वाहनावर आदळला़ या ट्रकच्या पाठीमागून आलेली ट्रक (क्ऱआऱजे़१९- जी़डी़७१६५ व आऱजे़१९- जे़डी़५२८६), या समोरील वाहनांवर आदळल्या़ त्यापाठोपाठ आलेली राज्य परिवहन महामंडळाची सोलापूर- मलकापूर ही बस (क्ऱएम़एच़१४- सी़पी़४९२१) ही ट्रकवर आदळली़ तर बसच्या पाठीमागून आलेला टेम्पो (क्ऱएम़एच़१४- सी़पी़४९२१) हा बसवर आदळला़ एकापाठोपाठ पाच वाहने एकमेकांवर आदळल्याने १२ जण जखमी झाले़ यात बसमधील अशोक प्रभाकर शिंदे (वय-३८ रा़पाटोदा), राधाकिसन अंबादास पेंढारे (वय-५० रा़तलवडा), माया सुभाष शिंदे (वय- ५५ रा़पाटोदा), वर्षा विशाल शेंडगे (वय-२६ रा़तुगाव), शाम गोविंद कुलकर्णी (वय- ६८ राक़न्हेरवाडी) या पाच प्रवाशांना पुढील उपचारासाठी बीडकडे पाठविण्यात आले़ तर रणजित वामनराव शिंदे (वय-४० ) व रघुदत्त वामनराव येंदे (वय-३३ दोघे रा़वाशी) या बंधुंना उपचारासाठी वाशी येथे पाठविण्यात आले़ तर सलेम शमशुद्दीन कुरेशी (वय-१६ राक़ोरेगाव), ममता राजेंद्र पालसकर (वय-४२, अमरावती), राजेंंद्र विठ्ठल पालसकर (वय-५०) हे किरकोळ जखमी झाले़ लिमचंद मोहन राठोड (वय-३७ बुलढाणा), अशोक प्रभाकर शिंदे (वय- ४५ रा़पाटोदा), जैनअल अशीद्दीन कुरेशी (वय-१८), रेशम दुर्गा चव्हाण (वय-३५ वाशी) हे जखमी झाले़
तसेच बसचालक डी़एनक़ापडे यांच्या गुडघ्यालाही जखमी झाली असून, त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले़ अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती़ पारगाव येथील ग्रामस्थ आणि वाशी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली़ या अपघाताची वाशी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)