गारजमध्ये पाच ट्रक जळाल्या
By Admin | Updated: September 21, 2014 00:42 IST2014-09-20T23:52:48+5:302014-09-21T00:42:44+5:30
शिऊर/गारज : गारज येथून जवळच असलेल्या ढेकू नदीवरील जुन्या पुलावर शनिवारी पाच ट्रक एकाच वेळी जळाल्याने संशय व्यक्त केला जात आहे;

गारजमध्ये पाच ट्रक जळाल्या
शिऊर/गारज : गारज येथून जवळच असलेल्या ढेकू नदीवरील जुन्या पुलावर शनिवारी पाच ट्रक एकाच वेळी जळाल्याने संशय व्यक्त केला जात आहे; मात्र या सर्व ट्रकमध्ये मांसाहारी पदार्थ असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे. पोलीसही याबाबत स्पष्ट काहीच सांगत नसल्याने आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी, ट्रक क्र. के.ए. ३९-५८३०, ए.पी. २४- डब्ल्यू. ४६८६, जी.टी. ९-झेड. ३०४६, एम.एच.०४- ९३९९ या ट्रक हैदराबादहून मालेगावकडे जात होत्या; मात्र कसारी घाटात त्या अडवून त्यांना माघारी पाठविण्यात आले. गारज शिवारातील ढेकू नदीच्या पुलावर या ट्रक उभ्या होत्या. शनिवारी अचानक त्यांना आग लागल्याचे काहींनी सांगितले; मात्र या ट्रक पेटविल्याचा संशय कायम आहे. येथे पोलीस महानिरीक्षक अमितेशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, गंगापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, महामार्ग पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. अग्निशामक दलाचे चार बंबही घटनास्थळी आले होते. वाहतूक पोखरीमार्गे वळविण्यात आली. या घटनेची शिऊर ठाण्यात नोंद झाली.