एमएच-सीईटीसाठी पाच हजार विद्यार्थी
By Admin | Updated: May 7, 2014 23:51 IST2014-05-07T23:50:38+5:302014-05-07T23:51:58+5:30
लातूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या वतीने आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी एमएच- सीईटी सामायिक परीक्षा गुरूवारी होत आहे़

एमएच-सीईटीसाठी पाच हजार विद्यार्थी
लातूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या वतीने आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी एमएच- सीईटी सामायिक परीक्षा गुरूवारी होत असून, लातूर जिल्ह्यात ११ केंद्रांवर ५४८६ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत़ आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी राज्यात १२४ महाविद्यालये आहेत़ त्यात ५७१० जागा उपलब्ध असून, या प्रवेश परीक्षेसाठी १ लाख ५३ हजार २३० विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत़ त्यापैकी लातूर जिल्ह्यातून ५ हजार ४८६ विद्यार्थी परीक्षेस आहेत़ भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांचा समावेश असलेली ही परीक्षा गुरूवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होईल़ परीक्षार्थ्यांनी सकाळी ९़१५ वाजता परीक्षा केंद्रांवर उपस्थित रहाणे बंधनकारक आहे़ परीक्षार्थींना प्रवेशपत्र आॅनलाईन पद्धतीने देण्यात आले आहे़ ६६६.ेूँी३2014.ूङ्म.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत़ सदर सामायिक परीक्षेसाठी शासनामार्फत या परीक्षेचे जिल्हा संपर्क अधिकारीपदी डॉ़विनायक आघाव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने दिली आहे़ (प्रतिनिधी)