मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास पाच हजार रुपये मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:04 IST2021-05-18T04:04:52+5:302021-05-18T04:04:52+5:30
औरंगाबाद : मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांस कोरोना झाल्यास पाच हजार रुपये आर्थिक आहाय्य देण्याचा निर्णय मनपा शिक्षक पतसंस्थेने सोमवारी ऑनलाईन ...

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास पाच हजार रुपये मदत
औरंगाबाद : मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांस कोरोना झाल्यास पाच हजार रुपये आर्थिक आहाय्य देण्याचा निर्णय मनपा शिक्षक पतसंस्थेने सोमवारी ऑनलाईन झालेल्या बैठकीत घेतला.
मनपा शिक्षक सहकारी पतसंस्थेची मासिक बैठक बेबी मालोदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात कोरोना या संसर्गजन्य आजाराची संभाव्य लाटेत विद्यार्थ्यांना लागण होण्याची शक्यता आहे. मनपाचा विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातील आहे. या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली तर पालकांना मदत म्हणून पाच हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने शहानिशा करून विद्यार्थ्यांची शिफारस केल्यास पालकांच्या नावे रुपये पाच हजारांचा धनादेश देण्यात येईल. बैठकीस पतसंस्थेचे उपाध्यक्ष जुबेर शेख, सचिव डॉ. संपत इधाटे, शिक्षणाधिकारी तथा संचालक रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी तथा संचालक संजीव सोनार, संचालक कामिनी सुरंगळीकर, अर्चना जोशी, भारत तीनगोटे, तुषार ताठे, राम सावंत, सदरखा तडवी, प्रकाश थोरे, सुनील नरवडे, व्यवस्थापक शिवाजी निकम व जीवन काळे यांची उपस्थिती होती.