शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

महिलांना पहिल्या अपत्यानंतर पाच हजार; आता दुसरी मुलगी झाल्यास मिळणार सहा हजार

By विजय सरवदे | Updated: July 7, 2023 19:55 IST

माता- नवजात बालकांसाठी योजना ठरतेय संजीवनी

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरी व ग्रामीण भागात मातृ वंदना योजनेचे काम उत्कृष्टपणे राबविण्यात आल्यामुळे जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात ७० हजार ८०९ महिलांना, तर नगरपालिका क्षेत्रात ६ हजार ६१९ आणि महापालिका कार्यक्षेत्रात ४२ हजार ३१७ महिलांना आर्थिक लाभ देण्यात आला आहे.

आता या योजनेच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली असून पूर्वी तीन टप्यात ५ हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जात होते. आता दोन टप्प्यांत महिलांना हा लाभ दिला जाणार आहे, तर दुसरे अपत्य मुलगी असेल, तर महिलेला एकाच टप्प्यात ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. गर्भवती महिला व मातांचे व त्यांच्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने मातृ वंदना योजना सन २०१७ पासून सुरू करण्यात आली.

काय आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना?प्रसूतीच्या अगोदर व प्रसूतीनंतर पहिल्या बाळाकरिता मातेला विश्रांती मिळावी आणि बुडीत मजुरीचा लाभ व्हावा, या उद्देशाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून सुरू करण्यात आली.

मोबाईलवर भरा ऑनलाईन अर्जमहिला व बाल विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर लाभार्थी महिलांना आपल्या मोबाईलवरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पहिला हप्ता ३ हजार रुपये पहिल्या अपत्यावेळी आरोग्य केंद्रात गरोदरपणाची नोंदणी व प्रसूतीपूर्व एक तपासणी केल्यास पहिला हप्ता ३ हजार रुपयांचा दिला जातो.

दुसरा हप्ता दोन हजारांचाबाळाचे प्राथमिक लसीकरण चक्र पूर्ण झाल्यानंतर २ हजारांचा दुसरा हप्ता दिला जातो.

दुसऱ्या अपत्यानंतर सहा हजारदुसरे बाळ जन्मल्यानंतर व ते अपत्य मुलगीच असल्यानंतर एकाच टप्प्यात ६ हजारांचा लाभ दिला जातो.

निकष काय?या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र राहाणार नाहीत. महिलांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे. बीपीएल शिधापत्रिकाधारक, मनरेगा कार्ड जॉबधारक महिला, अनु. जाती, जमातीच्या महिला व दिव्यांग महिला असाव्यात.

जिल्ह्यात १ लाख लाभार्थीयोजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात १ लाख १९ हजार ७४५ महिलांना आर्थिक लाभ देण्यात आला.

या योजनेसाठी आता सुधारित निकष आलेले आहेत. त्यामुळे नवीन नियमावलीनुसार जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.- डॉ. अभय धानोरकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :FamilyपरिवारAurangabadऔरंगाबाद