‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर औरंगाबादेत पाच शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:01 IST2018-02-15T00:01:16+5:302018-02-15T00:01:25+5:30

‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर पाच जोडप्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करून सहजीवनाचा मुहूर्त साधला.

Five Shubhamangal in Aurangabad on the auspicious day of 'Valentine's Day' | ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर औरंगाबादेत पाच शुभमंगल

‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर औरंगाबादेत पाच शुभमंगल

‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर पाच जोडप्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करून सहजीवनाचा मुहूर्त साधला. प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवशी अविनाश दांडगे-स्वाती शिर्के, वैभव गुलाखे-प्रीती साखरे, सुरेंद्र जगताप-अंबिका बोकण, समाधान नावकर-स्वाती राठोड, अन्वय वाळुंजकर-सायली सोनार या पाच जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी लग्न करून नेहमीसाठी एकमेकांचे होण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. १४ फेब्रुवारीला विवाह नोंदणी कार्यालयात पाच जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करून ‘व्हॅलेंटाइन डे’चा मुहूर्त साधला. रजिस्ट्री कार्यालयात बुधवारी मोठी गर्दी होती. त्यातच विवाह पोशाखात नटूनथटून आलेले नववधू व वर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विवाहाची नोंदणी केल्यानंतर जोडप्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. या आनंदात त्यांनी कार्यालयातील उपस्थितांनाही सहभागी करून घेतले.

Web Title: Five Shubhamangal in Aurangabad on the auspicious day of 'Valentine's Day'