पोलिस ठाण्यासमोरील ५ दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2016 00:16 IST2016-03-17T00:14:42+5:302016-03-17T00:16:15+5:30

गंगाखेड : शहरातील ऐन पोलिस ठाण्यासमोरीलच पाच दुकाने फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व इतर ऐवज पळविला आहे़

Five shops in front of the police station were broken | पोलिस ठाण्यासमोरील ५ दुकाने फोडली

पोलिस ठाण्यासमोरील ५ दुकाने फोडली

गंगाखेड : शहरातील ऐन पोलिस ठाण्यासमोरीलच पाच दुकाने फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व इतर ऐवज पळविला आहे़ बुधवारच्या पहाटे दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे़ दरम्यान, या प्रकरणातील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत़
दोन दिवसांपूर्वी महिलेचे हातपाय बांधून घर लुटण्याची तर बसस्थानकावरून रोख १ लाख रुपये पळविल्याची घटना घडली होती़ या दोन्ही घटना ताज्या असतानाच १६ मार्चच्या पहाटे पोलिस ठाण्यासमोरील लक्ष्मी व्यंकटेश औषधी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील १० हजार रुपये चोरट्यांनी पळविले तर मातोश्री मोबाईल शॉपी, शांता औषधी दुकान व इतर दुकानांचे कुलूप तोडण्यात आले़
दरम्यान, नंदकुमार लक्ष्मीकांत भरड यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़ ३ मार्च रोजी शहरातील या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ यापूर्वीही गतवर्षी परळी रोडवरील एका बारमध्ये चोरी करताना तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जेरबंद झाले होते़ तसेच ३ मार्च रोजी चार दुकाने फोडताना चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले होते़ मात्र अद्यापपर्यंत चोरट्यांचा शोध लागला नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: Five shops in front of the police station were broken