तीन महिन्यांत पाच पोलीस निरीक्षक
By Admin | Updated: August 8, 2016 00:38 IST2016-08-08T00:29:54+5:302016-08-08T00:38:42+5:30
भोकरदन : भोकरदन पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीचा खेळ सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये या ठाण्याला पाच

तीन महिन्यांत पाच पोलीस निरीक्षक
भोकरदन : भोकरदन पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीचा खेळ सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये या ठाण्याला पाच पोलिस निरीक्षक लाभले. ७ आॅगस्ट रोजी संजय लोहकरे यांच्या जागी सहाय्यक पोलिस निरीक्षक गोकुळसिग बुंदेले यांनी पदभार घेतला आहे़
भोकरदन पोलीस ठण्यात गेल्या तीन महिन्यांपूर्वी रामेश्वर रेंगे यांनी १६ मे २०१६ पर्यंत कार्यभार सांभाळला होता. त्यांनी भोकरदन येथील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यानंतर त्यांची घनसावंगीला बदली करण्यात आली. त्यांच्या जागी महेंद्र जगताप यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानी या ठाण्याचा आठ दिवस पदभार संभाळला त्यानंतर त्यांची पुणे येथे बदली करण्यात आली. त्यानंतर या ठाण्याचा पदभार जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. त्यानंतर यशवंत बागुल यांची ६ जून रोजी भोकरदन येथे बदली करण्यात आली त्यांनी एक ते दोन दिवस भोकरदन पोलिस ठाण्याचा पदभार संभाळला. त्याच वेळी मंठा येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांची ८ जूनला भोकरदनला बदली करण्यात आली होती.
लोहकरे यांनी दोन महिने या ठाण्याचा पदभार संभाळला. त्यानंतर ६ आॅगस्ट रोजी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी संजय लोहकरे यांची मुख्यालयात बदली केली, मात्र आता भोकरदन पोलीस ठाण्याला कोण पोलीस निरीक्षक द्यावा असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांसमोर पडला होता. अखेर जालना शहरातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळसिंग बुंदेले यांची भोकरदन पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. बुंदेले यांनी ७ आॅगस्ट रोजी दुपारी ११ वाजता संजय लोहकरे यांच्याकडुन पदभार घेतला आहे़ त्याच प्रमाणे पारध पोलिस ठाण्यात गेल्या एक महिन्यापूर्वीच बदलून आलेले राजीव तळेकर यांची तडकाफडकी जालना येथे बदली करण्यात आली आहे. त्याच्या जागी भागवत यांची नेमणूक करण्यात आल्याचे समजते तर भोकरदन पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार अंतरफ यांची परतूर येथे बदली करण्यात आली आहे़
भोकरदन पोलिस ठाण्याचा पदभार घेतलेले बुंदेले यांच्यासमोर भोकरदन पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ढासाळलेली कायदा व सुव्यवस्था, अवैध धंदे, वाळू चोरी, दबंगगिरी, अवैध दारू विक्री, रस्त्यावरील अस्ताव्यस्त वाहने, भुरट्या चोराचा बंदोबस्त करण्याचे आव्हान राहणार आहे़ (वार्ताहर)