पाच यात्रेकरूंचा संपर्क होईना !
By Admin | Updated: May 22, 2017 00:04 IST2017-05-22T00:01:24+5:302017-05-22T00:04:35+5:30
लातूर : उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनात जिल्ह्यातील २१ यात्रेकरू अडकले होते.

पाच यात्रेकरूंचा संपर्क होईना !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनात जिल्ह्यातील २१ यात्रेकरू अडकले होते. त्यातील १६ यात्रेकरूंशी संपर्क होऊन ते सुखरुप असल्याचे सांगितले. दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत उदगीरच्या पाच यात्रेकरूंचा संपर्क झाला नाही. या यात्रेकरूंचा संपर्क साधण्यासाठी नातेवाईकांबरोबरच जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी भूस्खलन झाले होते. उत्तराखंड यात्रेसाठी जिल्ह्यातील १६ यात्रेकरू गेल्याचे जिल्हा प्रशासनास नातेवाईकांनी कळविले होते. दरम्यान, शनिवारी रात्री उदगीर येथील एका नातेवाईकाने आमचेही पाचजण याच यात्रेसाठी गेल्याचे कळविले.
या यात्रेसाठी गेलेल्या चिमाचीवाडी येथील मीनाबाई गुरमे, पेठेवाडी येथील सुभाष पेठे, चंद्रकलाबाई पेठे, रामकिशन बंडगर, दैवशाला बंडगर, ज्ञानोबा पेठे, मंगलबाई पेठे, राधाबाई सुवर्णकार, खरबवाडी येथील लिंबाबाई धनासुरे, चवणहिप्परगा येथील लिंबराज बिराजदार, नागतीर्थवाडी येथील गणपती गरुडे यांच्याशी शनिवारी पहाटे संपर्क झाला. त्यांनी आपण सुखरुप असल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.