औशात मालवाहु टेम्पोच्या धडकेत पाच जण गंभीर

By Admin | Updated: July 14, 2016 01:05 IST2016-07-14T00:34:39+5:302016-07-14T01:05:15+5:30

औसा : शहरातील भादा रोडवर एका मालवाहु टेम्पो चालकाने दोन मोटार सायकल व अन्य चार वाहनांना धडक दिल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

Five people were seriously injured in the tempo of a freight car in Owaat | औशात मालवाहु टेम्पोच्या धडकेत पाच जण गंभीर

औशात मालवाहु टेम्पोच्या धडकेत पाच जण गंभीर


औसा : शहरातील भादा रोडवर एका मालवाहु टेम्पो चालकाने दोन मोटार सायकल व अन्य चार वाहनांना धडक दिल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
मालवाहू टेम्पो एम एच २४ जे ५३८८ हा लग्न समारंभ आटोपून बोरगावकडे वऱ्हाडी घेऊन जात असताना वाहन चालकाने औसा शहरातील हनुमान मंदिरानजीक एम एच २४ के ६५८५, एम एच २४ ए एम ६५१७ या दोन मोटारसायकल व एम एच २४ व्हि ९४५४ ही कार, एम एच २४ जे ७३०६, एम एच १२ एफ डी ४५७१, एम एच २५ आर १०९४ या मालवाहु व प्रवाशी टमटमला ना जोरदार धडका मारल्या प्रत्यक्षदशीर्नी सांगितले कि या मालवाहु टेम्पोच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन मागे पुढे करुन या वाहनांना धडका दिल्याचे सांगितले.
अपघातात अनिल ज्ञानोबा पोफळे (२५) रा. उटी बु , रोहण नारायण परदेशी (२०) रा.औसा बाळु बलभीम भंडारे (३०) चालक रा.बोरगाव, सोमनाथ नंदु कांबळे (१७) रा.औसा,अमोल बालाजी सुर्यवंशी (२२) रा.औसा हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना लातूरला पाठविण्यात आले आहे. तर दत्ता चव्हाण (२५) भादा व महादेव खिचडे (४२) रा.आलमला यांच्यावर औसा येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. लटपटे यांनी प्राथमिक उपचार केले़ वाहनांचा पंचनामा पोलिसांनी केला ़

Web Title: Five people were seriously injured in the tempo of a freight car in Owaat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.