दोन वाहनांच्या धडकेत पाच जण ठार
By | Updated: December 5, 2020 04:08 IST2020-12-05T04:08:53+5:302020-12-05T04:08:53+5:30
१६०० रोहिंग्यांना द्वीपावर पाठविले ढाका : बांगलादेशाने मानवाधिकार संघटनांचा आक्षेप झुगारून १२०० रोहिंग्या शरणार्थींना सेदूर द्वीपावर पाठविले आहे. या ...

दोन वाहनांच्या धडकेत पाच जण ठार
१६०० रोहिंग्यांना द्वीपावर पाठविले
ढाका : बांगलादेशाने मानवाधिकार संघटनांचा आक्षेप झुगारून १२०० रोहिंग्या शरणार्थींना सेदूर द्वीपावर पाठविले आहे. या द्वीपावर चक्रीवादळ व जलवायू परिवर्तनाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी तेथे पाठविण्यात आले आहे, असे बांगलादेशाचे म्हणणे आहे.
पश्चिम बंगालमधील सरकारी शाळा पाडली
मालदा : सरकारी शाळा पाडण्यात आली असून, याबाबत प्रशासनाने कानावर हात ठेवले आहेत. एक डिसेंबर रोजीची ही घटना आता उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. १९६९ मध्ये ही शाळा उभारण्यात आली होती. याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
कार कालव्यात पडून कुटुंब मृत्युमुखी
काकीनाडा (आंध्र प्रदेश) - नवी कोरी कार कालव्यात पडल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्य व त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. नवी कोरी कार घरी घेऊन येत असताना ही दुर्घटना घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.