टेकुळ्याच्या भाजीने पाच जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:57 IST2017-08-26T23:57:15+5:302017-08-26T23:57:15+5:30

टेकुळ्याची भाजी खालल्याने एकाच कुटूंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील धनगरमोहा येथे शनिवारी घडली़ गंगाखेड तालुक्यातील धनगरमोहा येथील जमाल खान पठाण यांच्या घरी टेकुळयाची भाजी केली होती़ ही भाजी कुटूंबातील जमाल खान पठाण, हमीदाबी जमालखान पठाण, शकीलाबी जमालखान पठाण, सुजातबी जमाल खान पठाण, मुस्कानबी जमाल खान पठाण या पाच जणांनी खाल्ली़ भाजी खालल्यानंतर शनिवारी सायंकाळी ५़३० ते ६ च्या सुमारास त्यांना उलट्या व जुलाब सुरू झाला़

Five people have poisoned by the banana vegetable | टेकुळ्याच्या भाजीने पाच जणांना विषबाधा

टेकुळ्याच्या भाजीने पाच जणांना विषबाधा

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : टेकुळ्याची भाजी खालल्याने एकाच कुटूंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील धनगरमोहा येथे शनिवारी घडली़
गंगाखेड तालुक्यातील धनगरमोहा येथील जमाल खान पठाण यांच्या घरी टेकुळयाची भाजी केली होती़ ही भाजी कुटूंबातील जमाल खान पठाण, हमीदाबी जमालखान पठाण, शकीलाबी जमालखान पठाण, सुजातबी जमाल खान पठाण, मुस्कानबी जमाल खान पठाण या पाच जणांनी खाल्ली़ भाजी खालल्यानंतर शनिवारी सायंकाळी ५़३० ते ६ च्या सुमारास त्यांना उलट्या व जुलाब सुरू झाला़
उलट्या व जुलाब सुरू झाल्याने त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले़
वैद्यकीय अधिकारी डॉ़ केशव मुंडे, परिचारिका संगीता लटपटे, राजेंद्र गायकवाड, हरंगुळ आरोग्य उपकेंद्राचे शेख खाँजा यांनी त्यांच्यावर उपचार केले़
यातील जमाल खान पठाण व मुस्कानबी पठाण यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी केशव मुंडे यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

Web Title: Five people have poisoned by the banana vegetable