पाच नवीन पोकलॅन यंत्राचे जिल्ह्यास लोकार्पण

By Admin | Updated: May 22, 2015 00:29 IST2015-05-22T00:13:52+5:302015-05-22T00:29:30+5:30

जालना : जिल्हा वार्षिक योजना सन २०१४-१५ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून जलयुक्त शिवार अभियानातील कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खरेदी केलेल्या नवीन

Five new poklan machinery districts | पाच नवीन पोकलॅन यंत्राचे जिल्ह्यास लोकार्पण

पाच नवीन पोकलॅन यंत्राचे जिल्ह्यास लोकार्पण


जालना : जिल्हा वार्षिक योजना सन २०१४-१५ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून जलयुक्त शिवार अभियानातील कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खरेदी केलेल्या नवीन ५ पोकलॅन मशिनचे लोकार्पण राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते आज कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे (जलसंधारण) यांच्या कार्यालयातील प्रांगण्यात करण्यात आले.
यावेळी आ. अर्जुनराव खोतकर, उमाकांत मानवतकर, मदनराव गिरी, अर्जुन राठोड, शहाजी राक्षे, एकनाथ थेटे, अपर जिल्हाधिकारी बी.एल. गिरी, उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जालना जिल्हा हा राज्यात सिंचनाच्या बाबतीत मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या भूगर्भातील पाण्याची पातळी अत्यंत खोल गेलेली आहे.
जिल्ह्याचे सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून, प्रशासनाच्या मालकीच्या पोकलॅनमुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आलेल्या गावात नद्या खोल करणे, गाळ काढणे यासारखी कामे रात्रं-दिवस करणे सोईचे होणार असल्याचे सांगून पुढच्या वर्षाच्या निधीमध्ये आणखीन पोकलॅन मशीन खरेदी करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री लोणीकर यांनी सांगितले.
यावेळी उपकार्यकारी अभियंता एस.पी. पन्हाळे, जि.प.सदस्य मोहन बाहेकर, गणेश खवणे, बी.डी. पवार, पंडितराव भुतेकर, रंगनाथ रेंगे, विठ्ठल बिडवे, तुकाराम गाढे, बापू मानवतकर, सोपान जईत, अशोक चिंचोलकर, लक्ष्मण दिवटे, भगवान आरडे, अनिल व्यवहारे, काटे महाराज, अंकुशराव नवल, जयसिंग गायकवाड, पंजाब बोराडे, शंतनु काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र जगताप, वास्तू विशारद जगदीश नागरे यांच्यासह सर्व तहसीलदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Five new poklan machinery districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.