मोटर सायकल चोरी प्रकरणी आरोपीस पांच महिन्याचा सश्रम कारावास
By Admin | Updated: February 28, 2017 19:25 IST2017-02-28T19:25:36+5:302017-02-28T19:25:36+5:30
मोटार सायकल चोरी प्रकरणी एका आरोपीस सिल्लोड न्यायालयाने ५ महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवारी (दि.२८)ठोठावली.

मोटर सायकल चोरी प्रकरणी आरोपीस पांच महिन्याचा सश्रम कारावास
ऑनलाइन लोकमत
अजिंठा, दि. 28 - मोटार सायकल चोरी प्रकरणी एका आरोपीस सिल्लोड न्यायालयाने ५ महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवारी (दि.२८)ठोठावली.
शिक्षा ठोठावन्यात आलेल्या आरोपीचे नाव बाळू खंडू सपकाळ रा.खुल्लोड ता.सिल्लोड असे आहे. अजिंठा पोलिसांनी योग्य तपास केल्याने आरोप सिद्ध झाले.यामुळे आरोपीला शिक्षा मिळाली यामुळे अजिंठा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या आरोपीने सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील कैलास धनवाई यांची हिरोहोन्डा कंपनीची मोटार सायकल दि.१ संप्टेबंर १५ रोजी रात्रीच्या सुमारास चोरली होती.या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन बीट जमादार महिला पोलीस नाईक कविता कुलते,शेख मुस्ताक यांनी सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे याच्या मार्गदर्शना खाली तपास केला होता. खुल्लोड ता.सिल्लोड येथील आरोपी बाळू खंडू सपकाळ यांनी घरात मोटारसायकल लपवून ठेवल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
त्याच्या घराची झड़ती घेतली असता सबंधित चोरीला गेलेली मोटार सायकल घरात आढळूण आली होती. घटनेचा रितसर पंचनामा करुण पोलिसांनी मोटार सायकल जप्त करुन आरोपी विरुद्ध सिल्लोड न्यायालयात दोषापत्र दाखल केले होते.
सिल्लोड न्यायालयाने दोन्ही कंडील यूक्तिवाद अयकुंन साक्षी पुरावे तपासुन मंगळवारी (दि.२८) वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.शासनाच्या वतीने सरकारी वकील खान यांनी काम पाहिले.
दोन महिन्यात दोन शिक्षा
बीटचा कारभार सांभाळण्याऱ्या महिला पोलीस नाईक कविता कुलते यांनी महिला असूनही चांगला तपास केला. 2 महिन्यात दोन आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. उंडणगाव येथील गायीला अमानुष मारहाण केल्या प्रकरणी मागच्या महिण्यात एका आरोपीला दंडा साहित शिक्षा झाली होती.तर आता ही दूसरी शिक्षा झाली आहे. या दोन यशा बद्दल महिला पोलीस नाईक कविता कुलते यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.