२४ तासात औरंगाबादमधून पाच बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 17:01 IST2017-08-05T17:00:00+5:302017-08-05T17:01:15+5:30
गेल्या २४ तासात शहराच्या वेगवेगळ्या भागातील दोन पुरुष, एक मुलगी आणि दोन तरुणी अशी पाच जण बेपत्ता झाले आहेत.

२४ तासात औरंगाबादमधून पाच बेपत्ता
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. ५ : शहरातून महिला, पुरूष आणि अल्पवयीन मुली गायब होण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. गेल्या २४ तासात शहराच्या वेगवेगळ्या भागातील दोन पुरुष, एक मुलगी आणि दोन तरुणी अशी पाच जण बेपत्ता झाले आहेत.
नंदनवन कॉलनीतील रहिवासी हर्षदा उर्फ गौरी दिलीप गोरखा (१८,) ही तरुणी ३ ऑगस्ट रोजी दुपारी छावणी येथे मामाच्या घरी जाऊन आजीला भेटून येते असे सांगून मोपेड घेऊन घरातून बाहेर पडली. छावणीत आजीला भेटल्यानंतर आईला गाडी देऊन परत येते, असे सांगून ती तेथून निघून गेली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तिच्या आईच्या मोबाईलवर तिने फोन केला. यावेळी तिच्या फोनवरून राहुल नावाचा तरूण बोलला आणि हर्षदा त्याच्यासोबत असल्याचे तो म्हणाला. मात्र, दुस-या दिवशीही ती घरी न परतल्याने तिच्या आईने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. हर्षदा उर्फ गौरी हिचा रंग गोरा, उंची ५फु ट,अंगावर काळी पॅण्ट आणि भगवे जॅकेट असे तिचे वर्णन आहे. शिवाय तिच्याजवळ एमएच २० सीजे ५८४१ या क्रमांकाची मोपेड आहे.
बालगृहातील मुलगी बेपत्ता
छावणीतील विद्यादीप बालगृहातील वर्षा भरत गायके ही १७ वर्षीय तरूणी ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरापासून बेपत्ता झाली. ७ जानेवारी रोजी ती मिलकॉर्नर परिसरात आढळल्यानंतर तिला पोलिसांनी विद्यादीप बालगृहात दाखल केले होते. दरम्यान ती अचानक बेपत्ता झाल्याने बालगृहाच्या अधिक्षिका सिस्टर विन्सटीना यांनी छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली. वर्षा हिची उंची १५०सेंटीमिटर,रंग सावळत्त, अंगावर जांभळी फुले असलेला पिवळा पंजाबी ड्रेस, पायजमा ,मराठी,हिंदी बोलते,असे तिचे वर्णन आहे.
रंजना दिपक सोनवणे (२७,रा. उस्मानपुरा, नागसेननगर) हि विवाहिता ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता मुकुंदवाडीत माहेरी राहत असताना बेपत्ता झाली. ३ रोजी घरी भांडी धुण्याचे काम करीत होती. आई-वडिल घरी नसल्याचे पाहून ती घरातून निघून गेली. दुस-या दिवशीही ती परतली नाही आणि नातेवाईकांकडेहि न गेल्याने तिचे वडिल विष्णू जाधव यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. तिचा रंग सावळा, उंची साडेपाच फुट, सडपातळ बांधा, केस काळे, अंगावर साडी आणि ब्लाऊज असे तिचे वर्णन आहे.
संजयनगर येथील अमोल नारायण महादाने (२५) हा तरुण ४ ऑगस्ट रोजी दुपारपासून बेपत्ता झाला. अमोल नातेवाईकांकडे न आढळल्याने त्याची आई संगीता महादाने यांनी जिन्सी ठाण्यात तक्रार नोंदविली. संजय यांची उंची५ फुट २ इंच, रंग सावळा, अंगावर निळी चौकडी शर्ट, निळी पॅण्ट, चप्पल, चेहरा गोल, त्वचा लालसर असे त्याचे वर्णन आहे. या वर्णनाचा तरूणकोणास आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस नाईक उगले यांनी केले.
अन्य एका घटनेत मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील रहिवासी राजू बाजीराव घुले (३५) हे ३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेपासून बेपत्ता झाले. नातेवाईक आणि मित्रांकडे न आढळल्याने विमल राजू घुले यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. राजू यांचा चेहरा लांबट, रंग सावळा, उंची साडेपाच फुट, सडपातळ बांधा, पायात सॅण्डल, केस काळे असे त्याचे वर्णन आहे. पोलीस नाईक जाधव हे पुढील तपास करत आहेत.