पाच लाखांवर भाविकांनी घेतले रेणुकामातेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:19 IST2017-09-25T00:19:42+5:302017-09-25T00:19:42+5:30
गडावरील श्री रेणुकामाता मंदिरात रविवारी अश्विन शु़ चतुर्थी ललिता पंचमीच्या दिवशी श्री रेणुकामातेची महापूजा करण्यात येवून वैदिक अलंकार पूजनासह नारंगी रंगाचे महावस्त्र चढविण्यात आले़ फळांची आरास, यानंतर श्री भगवान परशुराम मंदिर परिसरात भाविकांसाठी पंचपक्वानांचा महाप्रसाद सुरू करण्यात आला़ यावेळी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी सहपरिवार मातेचे दर्शन घेत महाआरतीत सहभाग घेतला़

पाच लाखांवर भाविकांनी घेतले रेणुकामातेचे दर्शन
\लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीक्षेत्र माहूर : गडावरील श्री रेणुकामाता मंदिरात रविवारी अश्विन शु़ चतुर्थी ललिता पंचमीच्या दिवशी श्री रेणुकामातेची महापूजा करण्यात येवून वैदिक अलंकार पूजनासह नारंगी रंगाचे महावस्त्र चढविण्यात आले़ फळांची आरास, यानंतर श्री भगवान परशुराम मंदिर परिसरात भाविकांसाठी पंचपक्वानांचा महाप्रसाद सुरू करण्यात आला़ यावेळी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी सहपरिवार मातेचे दर्शन घेत महाआरतीत सहभाग घेतला़
२४ सप्टेंबर रोजी ललिता पंचमीच्या दिवशी अध्यक्ष न्या़सुधीर पी़ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष आसाराम जहारवाल, सचिव नरेंद्र देशमुख, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भवानीदास भोपी, विनायकराव फांदाडे, चंद्रकांत भोपी, समीर भोपी, श्रीपाद भोपी, संजय कान्नव, आशिष जोशी यांनी आलेल्या भाविकांसाठी ठिकठिकाणी, पाणी, महाप्रसाद, रांगेत सुरक्षासह मातेची महाआरती, अलंकार, महावस्त्रांसह फळांची आराससह इतर सर्व कार्यक्रम विधीवत पार पाडले़ प्रचंड गर्दीतही लाखो भाविकांनी मातेचे दर्शन घेत आपली यात्रा सुखद केली़
भाविकांनी रविवारी पहाटे ४ वाजेपासूनच पायºयांवर रांगेत गर्दी केली होती़ दुपारी भर उन्हातही २२५ पायºयांवर उभे राहून उकाडा सहन करीत भाविकांनी दर्शन घेतले़ यावेळी देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी भाविकांनी लाखो पाणी पाऊचचे वाटप केले़ रविवारचा दिवस असल्याने दिवसभरात लाखो भाविकांनी गर्दी केल्याने एसटी महामंडळाच्या ८० पेक्षा जास्त बसेस हाऊसफुल्ल जात होत्या़ तसेच गडावरील पायºया व रस्ते भाविकांनी फुलून गेल्याने शहरासह गडावर अनेक ठिकाणी एसटी थांबवाव्या लागल्या़ पार्किंगच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती़
आलेल्या लाखो भाविकांना त्रास होवू नये यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, पो़नि़ अभिमन्यू साळुंके, सपोनि शिवप्रकाश मुळे, पोलीस उपनिरीक्षक अनंतसिंह चव्हाण यांच्यासह ५०० पेक्षा जास्त पोलीस व होमगार्डसचा कडक बंदोबस्त ठेवला होता़
रविवारी ललिता पंचमीच्या दिवशी मुंबई येथील प्रसिद्ध गायक पं़ श्रीधर फडके यांच्या मातेची आरती तसेच भक्ती संगीताच्या कार्यक्रमाने आलेल्या भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले़ यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, पुजारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ शहरातील टी पॉर्इंट येथे किनवटच्या कृष्णप्रिय गोशाळेकडून भाविक-भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला़