टेम्पो-जीपच्या धडकेत पाच जखमी
By Admin | Updated: November 19, 2014 13:22 IST2014-11-19T13:18:05+5:302014-11-19T13:22:14+5:30
जिंतूर शहरापासून जवळच असलेल्या अकोली फाट्याजवळ टेम्पो- जीपच्या धडकेत पाच जण जखमी झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी घडली.

टेम्पो-जीपच्या धडकेत पाच जखमी
जिंतूर: शहरापासून जवळच असलेल्या अकोली फाट्याजवळ टेम्पो- जीपच्या धडकेत पाच जण जखमी झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी घडली.
अकोली फाट्याजवळ टेम्पो ए. पी. २५- ए-८६१७ हा जालना येथून नांदेडकडे जात होता. पाठीमागून आलेल्या जीपने एम. एच. २६ - व्ही. ९९३३ ने जोराची धडक दिली. या अपघातात जीपमधील सचिन तेहरा (वय ३0), शैलेश जाधव (१९), अविनाश कांबळे (२४ सर्व रा. नांदेड) हे जखमी झाले. यापैकी सचिन तहेरा व शैलेश जाधव या दोघांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर दोन जखमीची नावे कळू शकली नाहीत. तसेच पैकी दोघा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. याप्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (/वार्ताहर)