साळी फाऊंडेशनतर्फे पाचशे वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:02 IST2021-06-30T04:02:17+5:302021-06-30T04:02:17+5:30
वृक्षारोपण माहिती फलकाचे अरविंद धावणे, आनंद पावले, पोपटराव रसाळ व रेखा बोके यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी योग ...

साळी फाऊंडेशनतर्फे पाचशे वृक्षांची लागवड
वृक्षारोपण माहिती फलकाचे अरविंद धावणे, आनंद पावले, पोपटराव रसाळ व रेखा बोके यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी योग शिक्षक राजेश मेंद्रे यांनी प्लास्टिक बॅग व पाणी बाॅटल यांचा कसा सदुपयोग करता येईल हे प्रयोगाद्वारे दाखवून दिले. वैभव ढोरजे यांनीही माहिती दिली.
औरंगाबाद येथे साळी समाजाची ३७० घरे आहेत. एक घर - एक झाड या प्रमाणे मंगेश कुऱ्हे व सुरेखा जयरंगे यांनी ३७५ वृक्ष योगदान स्वरुपात दिले. तेजस आचार्य, बिपिन आचार्य, निरंजन आचार्य, विश्वजीत शेंद्रे, अनिल लेंभे, ध्रुवराज चोपडे, विजय रानभरे, श्रेयस ढोरजे, दत्ता भागवत, सोमनाथ वऱ्हाडे, गौरव भागवत, प्रितेश सातपुते, जनार्दन बनसोडे, माधुरी ढोरजे, शोभा सोनारे आदींची उपस्थिती होती.