अंतिम टप्प्याच्या ५ कोटींची मदत वर्ग

By Admin | Updated: June 7, 2014 00:25 IST2014-06-06T23:51:05+5:302014-06-07T00:25:05+5:30

अंबड : तालुक्यातील २१ गावातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यातील सुमारे ५ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

Five crores help group for the last phase | अंतिम टप्प्याच्या ५ कोटींची मदत वर्ग

अंतिम टप्प्याच्या ५ कोटींची मदत वर्ग

अंबड : तालुक्यातील २१ गावातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यातील सुमारे ५ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील १३७ गावातील सुमारे ६२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण ३९ कोटी ४१ लाख ७३ हजार ९३१ रुपयांची मदत वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते. महसूल विभागाने पंचनामे करुन पात्र शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्याप्रमाणे संबंधितांच्या याद्या तयार करुन पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु केली. अंबड तालुक्यातील १३७ गावातील शेतकऱ्यांना तीन टप्प्यात ही मदत देण्यात आली.
तिसऱ्या टप्प्यातील २१ गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली मदत पुढीलप्रमाणे आहे. बनटाकळी (२९ लाख ३७ हजार रुपये), शिरनेर (२३ लाख ७५ हजार ७५० रुपये), भोकरवाडी (११ लाख ८३ हजार ३०० रुपये), पागीरवाडी (१६ लाख १ हजार ३५० रुपये), लखमापुरी (३१ लाख ५६ हजार ७५० रुपये), बेलगाव (२५ लाख ५७ हजार ५०० रुपये), कुक्कडगाव (२९ लाख ७५ हजार ९५० रुपये), दाढेगाव (४२ लाख ७३ हजार रुपये), पिठोरी सिरसगांव (७३ लाख ७२ हजार ६०० रुपये), चिकनगाव (२० लाख ५५ हजार १०० रुपये), माहेरभायगाव (१९ लाख १७ हजार १५० रुपये), नांदी (२० लाख ६१ हजार १५० रुपये), किनगाव (१७ लाख ११ हजार ५० रुपये), किनगाववाडी (१९ लाख ९२ हजार ९५० रुपये), शेवगा (२५ लाख १२ हजार ३०० रुपये), वाघलखेडा (१४ लाख ८१ हजार रुपये), सारंगपूर (१३ लाख ४६ हजार रुपये), बठाण खु.(११ लाख ५८ हजार ३५० रुपये), नागझरी (१२ लाख १५ हजार ५०० रुपये), दहिपुरी (२४ लाख ३७ हजार ३५० रुपये), बोरी (१२ लाख ९३ हजार २५० रुपये) अशा प्रकारे २१ गावातील शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ९६ लाख १४ हजार ३५० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सावंत यांनी दिली. (वार्ताहर)
६२ हजार शेतकऱ्यांना ३९ कोटी ४१ लाख
आतापर्यंत अंबड तहसील कार्यालयाने पहिल्या टप्प्यात ७६ गावातील ३२ हजार शेतकऱ्यांना १९ कोटी ८७ लाख ३७ हजार १७० रुपये, दुसऱ्या टप्प्यात ४० गावातील २० हजार शेतकऱ्यांना १४ कोटी ५० लाख ६ हजार ६१ रुपये तर तिसऱ्या टप्प्यात २१ गावातील १० हजार शेतकऱ्यांना ४ कोटी ९६ लाख १४ हजार ३५० रुपये अशा प्रकारे तीन टप्प्यात १३७ गावातील ६२ हजार शेतकऱ्यांना ३९ कोटी ४१ लाख ७३ हजार ९३१ रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.

Web Title: Five crores help group for the last phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.