पाच गुन्हे उघडकीस
By Admin | Updated: May 19, 2017 00:27 IST2017-05-19T00:23:05+5:302017-05-19T00:27:50+5:30
जालना : कदीम जालना व सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीसह वाहन चोरीचे पाच गुन्हे विशेष कृती दलाने उघडकीस आणले.

पाच गुन्हे उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कदीम जालना व सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीसह वाहन चोरीचे पाच गुन्हे विशेष कृती दलाने उघडकीस आणले. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार संशयितांकडून दोन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या एका गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयित विशाल शामराव पवार व दीपक देवीदास खरात यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी एक लाख सहा हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. सदर बाजार ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या एका गुन्ह्यातील संशयित नजीब शेख जमील (रा.चंदनझिरा) यास अटक करून पोलिसांनी ७६ हजार ३०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले. अन्य एका गुन्ह्यात हव्या असलेल्या गजानन विष्णू गवारे, ऋुषीकेश नबाजी गागरडे यांच्याकडून पोलिसांनी ३५ हजारांचा एक लॅपटॉप जप्त केला. औद्योगिक वसाहतीमधून सळयांनी भरलेला ट्रक पळवून नेणाऱ्या आनंद गौतम पाखरे, संदीप वैजिनाथ गवारे यांना अटक केली असून, त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. यात संशयित गजानन गवारे व ऋुषीकेश नबाजी गागरडे यांचा समावेश असल्याचे चौकशीत समोर आले आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, साहाय्यक निरीक्षक विनोज इज्जतपवार यांच्या पथकाने ही कारवाइर् केली.