औरंगाबादेत एमआयएमचे पाच नगरसेवक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:23 IST2018-01-07T00:22:14+5:302018-01-07T00:23:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महापौरांवर खुर्ची भिरकावल्याच्या प्रकरणात एमआयएमच्या दोन नगरसेवकांची शुक्रवारी थेट हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आलेली ...

औरंगाबादेत एमआयएमचे पाच नगरसेवक संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापौरांवर खुर्ची भिरकावल्याच्या प्रकरणात एमआयएमच्या दोन नगरसेवकांची शुक्रवारी थेट हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आलेली असताना शनिवारी महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात पाच नगरसेवकांनी अतिक्रमण हटावच्या कारवाईत हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे त्वरित पाठवून देण्याचे आदेशही महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. शासनानेही उद्या नगरसेवक पद रद्द करण्यास हिरवा कंदिल दाखविला तर एमआयएम पक्ष संकटात सापडणार आहे.
या पाच जणांचे पद जणार
च्विरोधी पक्षनेता फेरोज खान, गटनेता नासेर सिद्दीकी, नगरसेवक जमीर कादरी, नगरसेविका सरवत बेगम आरेफ हुसैनी, साजेदा सईद फारुकी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला. कारवाईत नगरसेविका सरवत बेगम यांचे पती आरेफ हुसैनी, साजेदा बेगम यांचे पती सईद फारुकी हस्तक्षेप करीत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.
नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर
च्तब्बल पाच तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सायंकाळी जाहीर केले की, दमडी महल प्रकरणात एमआयएमच्या नगरसेवकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी कारवाईत हस्तक्षेप केल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. यापूर्वीही मनपा अधिकाºयांना धमकावणे, अनधिकृत बांधकामांमध्ये हस्तक्षेप करणे, आदी असभ्य वर्तणूक नगरसेवकांनी केलेली आहे. महाराष्टÑ महापालिका अधिनियम १०-१-ड नुसार दोषी नगरसेवकांवर कारवाई करावी. कलम १०-१-१-अ अनुसार शासनाकडे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी पाठविण्यात यावे, असा ठराव मंजूर केला. हा ठराव त्वरित शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था आयुक्तांनी कारवाई असेही त्यांनी नमूद केले.
जागा शासनाची अन्...
रस्ता रुंदीकरणात श्रीराम पवार यांचे घर मनपाकडून पाडण्यात आले. नेमकी ही जागा कोणाच्या मालकीची होती, असा प्रश्न नगरसेवक जंजाळ यांनी उपस्थित केला. नगररचना विभागाचे सहायक नगररचनाकार जयंत खरवडकर उत्तर देण्यासाठी उभे राहताच नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी त्यांना कडाडून विरोध केला. त्यांची नियुक्तीच नगररचनामध्ये नसताना ते उत्तर कसे देणार? यावर उपअभियंता ए.बी. देशमुख यांनी उत्तर दिले. मूळ जागा महसूल विभागाची होती, असे त्यांनी सभागृहात सांगितले. महापालिकेने परस्पर जागा कशी ताब्यात घेतली. महसूल विभागाने महापालिकेला आमच्या जागेवरील अतिक्रमण काढा, असे पत्र दिले होते का? मनपा परस्पर जाऊन जागा कशी काढू शकते. यावर प्रशासन निरुत्तर झाले.