पाच मतदार संघात ७७ उमेदवार भवितव्य अजमाविणार
By Admin | Updated: October 2, 2014 00:36 IST2014-10-02T00:19:41+5:302014-10-02T00:36:01+5:30
जालना : जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निवडणूक रिंगणात प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष असे एकूण ७७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

पाच मतदार संघात ७७ उमेदवार भवितव्य अजमाविणार
जालना : जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निवडणूक रिंगणात प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष असे एकूण ७७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ६९ उमदेवारांनी माघार घेतली.
युती आणि आघाडीच्या ताटातुटीमुळे निवडणूक रिंगणातील संख्या वाढणार की कमी होणार, अशी चर्चा या पाचही मतदारसंघांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. काही पक्षातील मंडळींनी बंडखोरी केल्याने त्यांनी माघार घेण्यासाठी संबंधितांची पक्षश्रेष्ठी समजूत काढण्यात यशस्वी होणार का, अशी चर्चाही सुरू होती. त्यामुळे माघारीकडे सर्व जनतेचे लक्ष लागून होते.
जालन्यात चौरंगी लढत
जालना मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या बुधवारी शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात १७ उमेदवार असून दोन ईव्हीएमद्वारे १५ आॅक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे कैलास गोरंट्याल, सेनेचे अर्जुन खोतकर व भाजपाचे अरविंद चव्हाण, बसपाचे रशिद पहेलवान यांच्यात चौरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे. तर राकॉँचे खुशालसिंह ठाकूर, मनसेचे रवि राऊत त्यात रंग भरतील, अशी चर्चा आहे.
उमेदवारी मागे घेण्याच्या बुधवारी शेवटच्या दिवशी शेख कदीर शेख अब्दूल रशीद मोमीन, राजेंद्र संपतराव खरात, सुनील रूपा खरे, संतोष उनगे मोरे, राजाभाऊ कुंडलिक उनगे, दत्तात्रय ग्यानदेव कदम, शेख गुलामनबी चाँद तसेच ३० सप्टेंबर रोजी संगीता कैलास गोरंट्याल अशा आठ उमेदवारांनी माघार घेतली.
जालन्यातील निवडणूक रिंगणातील उमेदवार - अर्जुन खोतकर (शिवसेना), कैलास गोरंट्याल (काँग्रेस), अब्दूल रशीद (बसपा), अरविंद चव्हाण (भाजपा), खुशालसिंह ठाकूर (राकाँ), रवि राऊत (मनसे), बळीराम कोलते (पीझंटस् अॅन्ड वर्कर्स पार्टी आॅफ इंडिया), खालेद बीन चाऊस (भारिप बहुजन महासंघ), धनसिंग सूर्यवंशी (हिंदू महासभा), सुदाम बनसोड (बहुजन मुक्ती पार्टी)े, कैलास घोरपडे, फारूक ईलाहीखान, दादाराव लहाने, संदीप खरात, ज्ञानेश्वर नाडे, अॅड. ज्ञानेश्वर वाघ (सर्व अपक्ष).
बोराडे यांची आश्चर्यकारक माघार
परतूर : परतूर विधानसभा मतदार संघातील निवडणूक रिंंगणात एकूण १२ उमेदवार राहिले असून, आज १४ जणांनी या निवडणूकीतून माघार घेतली आहे.
परतूर विधानसभा मतदारसंघात छाननी नंतर एकूण २६ अर्ज राहीले हाते. उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी १४ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात एकूण १२ उमेदवार राहिले आहेत. यामध्ये बाबासाहेब आकात मनसे, मारोती खंदारे कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी, सुरेशकुमार जेथलिया भारतीय काँग्रेस, डवरे रतन कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया, बबनराव लोणीकर भाजपा, राजेश सरकटे रा.कॉ, विजय वेढेकर बसपा, सोमनाथ साखरे शिवसेना, अकबर खॉबनेखा समाजवादी पार्टी, रामराव राठोड भारिप बहुजन महासंघ, निवास चव्हाण अपक्ष, भगवान पाटोळे अपक्ष यांचा समावेश आहे. तर उमेदवारी मागे घेणाऱ्यांमध्ये राहूल लोणीकर, मोहन अग्रवाल, गोपाळराव बोराडे, बाळकृष्ण कानड, महमद बरेखानी, हरीभाऊ चव्हाण, रमेश राठोड, अ. शेख रफिक, आसाराम साबळे, तरवटे शिवाजी, अतिष राठोड, मोईन कुरेशी, जिजाबाई जाधव, चोखाजी सौंदर्य या चौदाजणांचा समावेश आहे.
बसपाकडून उमेदवारी दाखल करणारे गोपाळराव बोराडे यांनी आज आश्चर्यकारक माघार घेतली. यापुर्वी त्यांनी काँग्रेस व मनसे कडून दोन वेळा विधानसभा लढवली होती, यावळीही त्यांनी बसपा कडून उमेदवारी दाखल केली होती, परंतु काही तांत्रीक कारणा मुळे त्यांचा पक्षाकडून भरलेला अर्ज छाननीत बाद झाला व अपक्ष भरलेला अर्ज मंजूर झाला. आज नामनिर्देशन परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्षाचाही अर्ज गोपाळराव बोराडे यांनी अश्चर्यकारक रित्या काढून घेतला हे विशेष
बदनापुरात बहुरंगी लढत
बदनापूर : बदनापूर विधानसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी एकूण सात उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतल्यामुळे आता १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
यात नारायण कुचे (भाजपा), ज्ञानेश्वर गायकवाड (मनसे), रुपकुमार (बबलू) चौधरी (राष्ट्रवादी काँग्रेस), संतोष सांबरे ( शिवसेना), विश्वजित साळवे (बसपा),सुभाष मगरे (काँग्रेस), शिवाजी आदमाने ( रिपब्लिकन सेना), अरुण जाधव (बहुजन मुक्ती पार्टी), तुकाराम हिवराळे ( भारिप बहुजन महासंघ), इश्वर बिल्होरे ( हिंदु महासभा), गणेश खरात (अपक्ष), सर्जेराव जाधव (अपक्ष), दिलीप रोकडे (अपक्ष), ज्ञानेश्वर कुरील (अपक्ष), राजेश ओ. राऊत (अपक्ष) हे निडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भारत कदम यांनी दिली. दरम्यान, येथील लढत बहुरंगी होणार आहे.
घनसावंगीत चौरंगी लढत
घनसावंगी - मतदारसंघात ११ जणांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात १४ उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे राजेश टोपे, भाजपाचे विलास खरात, काँग्रेसचे संजय लाखे, शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण यांच्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनसेचे सुनील आर्दड हेही त्यात रंग भरण्याची शक्यता आहे. या पाच उमेदवारांसह हिंदुस्थान जनता पार्टीचे दिनकर उघडे, भारिप बहुजन महासंघाचे देवीदास कोळे, बहुजन मुक्ती पार्टीचे सुनील जाधव तसेच अपक्ष म्हणून किशोर मुन्नेमाणिक, अर्जुन गाढे, महेंद्र चौंढेकर, सर्जेराव जाधव, शेख खुर्शीद अहेमद यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
भोकरदन मतदारसंघात ३८ पैकी १९ उमेदवारांनी माघार घेतल्याने १९ उमेदवार रिंगणात आहेत. यात चंद्रकांत दानवे (राकाँ), संतोष दानवे (भाजपा), सुरेश गवळी (काँग्रेस), रमेश गव्हाड (सेना) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. काही बंडखोरही रंग भरतील.
जालना मतदारसंघात बुधवारी आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने १७ उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत. यात प्रामुख्याने कैलास गोरंट्याल (काँग्रेस), अर्जुन खोतकर (शिवसेना), अरविंद चव्हाण (भाजपा), रशीद पहेलवान (बसपा) यांच्यात लढत होत असल्याचे चित्र आहे.
परतूर मतदारसंघात २६ पैकी १४ जणांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार रिंगणात आहेत. यात सुरेश जेथलिया (काँग्रेस), बबनराव लोणीकर (भाजपा), राजेश सरकटे (राकाँ), सोमनाथ साखरे (शिवसेना), बाबाासाहेब आकात (मनसे) यांच्यात प्रमुख लढत आहे.
घनसावंगी मतदारसंघात बुधवारी अकरा उमेदवारांनी माघार घेतल्याने १४ उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने राजेश टोपे (राकाँ), विलास खरात (भाजपा), हिकमत उढाण (शिवसेना), संजय लाखे (काँग्रेस), सुनील आर्दड (मनसे) यांच्यात लढत होत असल्याचे चित्र आहे.
बदनापूर मतदारसंघात संतोष सांबरे (सेना), बबलू चौधरी (राकाँ), नारायण कुचे (भाजपा), ज्ञानेश्वर गायकवाड (मनसे), सुभाष मगरे (काँग्रेस) यांच्यात प्रमुख लढती होतील, असे चित्र दिसून येत आहे. येथे काही बंडखोरही रंग भरतील.
भोकरदन : विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १९ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. १९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये काँग्रेसच्या लक्ष्मणराव दळवी व राष्ट्रवादीचे शफीकखॉ पठाण यांनी बंडखोरी करीत आव्हान कायम ठेवले आहे.
४ ३९ उमेदवारानी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी गीताबाइर्् म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यामुळे ३८ उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते. आता १९ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. यामध्ये आ़ चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी), ़ संतोष दानवे (भाजपा), सुरेश गवळी (कॉंग्रेस) रमेश गव्हाड (शिवसेना), दिलीप वाघ (मनसे) , लक्ष्मणराव दळवी (अपक्ष), शफीकखॉ पठाण (अपक्ष), गौतम म्हस्के (बहुजन समाजपार्टी), शिवाजी इंगळे (भारतीय शेतकरी कामगार पक्ष), किसन बोर्डे (रिपब्लिकन बहुजन सेना), मिलिंद डिगे (आंबेडकरराईट पार्टी आॅफ इंडिया), प्रकाश सुरडकर (अपक्ष) दीपक बोराडे (अपक्ष), महादु सुरडकर (अपक्ष), विलास बोर्डे (अपक्ष), शंकर क्षीरसागर (अपक्ष), बाबासाहेब शिंदे (अपक्ष), काशीनाथ सावंत (अपक्ष), अॅड. फकिरा सिरसाठ (अपक्ष) हे १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
४निर्मलाताई दानवे, राजाभाऊ देशमुख, श्रीरंग पाटील, सुरेश तळेकर, केशव पाटील जंजाळ, सतीष देशमख, जमील कादरी, हरिभाऊ रत्नपारखे, राखीताई वाघ, मन्सुरबेग मिर्झा, शेख अब्दुल रऊफ, पांडुरंग बारोटे, शेख शफिक फैजमहम्मद, भूषण शर्मा, रामकिसन बनकर, प्रतापसिंंग काकरवाल, नसीमखॉ बशिरखॉ पठाण, संजय इंच्चे, नसीरखॉ दौलतखॉ पठाण या १९ उमेदवारांनी १ आॅक्टोबर रोजी अर्ज मागे घेतले. या निवडणुकीत काँग्रेसचे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव दळवी व राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक शफीकखॉ पठाण यांनी या मातब्बर नेत्यांनी या निवडणुकीत बंडखोरी केली. आता या मतदार संघात सप्तरंगी निवडणूक होण्याची चिन्हे आहेत़