मराठवाड्यात साडेपाच हजार कि.मी.रस्ते गेले वाहून

By | Updated: November 28, 2020 04:10 IST2020-11-28T04:10:19+5:302020-11-28T04:10:19+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे साडेपाच हजार कि. मी. रस्ते पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत. रस्त्यांची कनेक्टिव्हिटी तुटल्यामुळे शेतकऱ्यांना ...

Five and a half thousand km of roads were carried in Marathwada | मराठवाड्यात साडेपाच हजार कि.मी.रस्ते गेले वाहून

मराठवाड्यात साडेपाच हजार कि.मी.रस्ते गेले वाहून

औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे साडेपाच हजार कि. मी. रस्ते पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत. रस्त्यांची कनेक्टिव्हिटी तुटल्यामुळे शेतकऱ्यांना माल बाजारपेठेत आणण्यास अडचणी येत असून, रस्ते विकासासाठी शासनाने १० हजार कोटींच्या पॅकेजमधून काही रक्कम रस्ते बांधणीसाठी देण्याचे ठरविले आहे. त्याअनुषंगाने मराठवाडा विभागात ५५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे. साठविलेला शेतमाल, जनावरांचे गोठे, बी-बियाणे शेतात असलेल्या घरातील जीवनावश्यक वस्तू महापुरात वाहून गेल्या. खरिपातील उभे पीक अतिवृष्टीने आडवे झाले. शेतकऱ्यांच्या या नुकसानीसोबतच दळणवळणासाठी असलेले रस्तेही वाहून गेले. त्या रस्त्यांची डागडुजी करणे, काही नवीन पक्के रस्ते तयार केल्यास शेतमालाला मार्केटपर्यंत नेणे सोपे होईल. भाजीपाला, फळे, दूध हा माल वेळेत बाजारपेठेपर्यंत जाणे आवश्यक असते. त्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे. याचा विचार करूनच शासनाने अतिवृष्टीसाठी जाहीर केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून ५ हजार कोटी रुपये रस्तेविकासासाठी दिले जाणार आहेत. पुढच्या आठवड्यात याबाबत शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता असून विभागात सुमारे ५५० कोटी रुपयांचा खर्च रस्तेबांधणी व दुरुस्ती, पूल दुरुस्तीसाठी लागणार आहेत. अनुदान मागणीचा अहवाल शासनाकडे बांधकाम विभागाने पाठविला आहे

Web Title: Five and a half thousand km of roads were carried in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.