साडेपाच लाखांचे दागिणे पळविले
By Admin | Updated: March 13, 2015 00:43 IST2015-03-13T00:19:45+5:302015-03-13T00:43:10+5:30
परळी : शहरातील जलालपूर भागातील एका डॉक्टरच्या घराच्या दरवाजाचा कोंडा उचकून कपाटातील पाच लाख ४२ हजार रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिणे व

साडेपाच लाखांचे दागिणे पळविले
परळी : शहरातील जलालपूर भागातील एका डॉक्टरच्या घराच्या दरवाजाचा कोंडा उचकून कपाटातील पाच लाख ४२ हजार रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिणे व एक मोबाईल पळवून नेल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली.
जलालपूर भागातील अरूणोदय रेसीडेन्सीमध्ये राहत असलेले डॉ. श्रीनिवास मुंडे हे लातूर येथे कुटुंबियासह बुधवारी कामासाठी गेले होते. गुरुवारी लातूरहून परत आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. कपाटातील सोन्याचे दागिणे, एक मोबाईल हॅन्डसेट चोरट्यांनी नेला. सदर ऐवजाची किंमत ५ लाख ४२ हजार ५०० रुपये असल्याचे डॉ. मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. तसेच ठसे तज्ज्ञांनीही भेट दिली. दरोडा प्रतिबंधक पथकाने धाव घेतली. शहर ठाण्यात गुन्हा नोंद असून तपास सहायक निरीक्षक अजित विसपुते करीत आहेत. (वार्ताहर)