विनयभंग प्रकरणी पाच आरोपी अटकेत

By Admin | Updated: May 24, 2014 01:39 IST2014-05-24T01:09:26+5:302014-05-24T01:39:15+5:30

जालना : येथील कादराबाद भाजीमंडई भागात एका सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग करणार्‍या फारूक हफीज पठाण व त्याच्या चार साथीदारांना

Five accused arrested in molestation case | विनयभंग प्रकरणी पाच आरोपी अटकेत

विनयभंग प्रकरणी पाच आरोपी अटकेत

जालना : येथील कादराबाद भाजीमंडई भागात एका सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग करणार्‍या फारूक हफीज पठाण व त्याच्या चार साथीदारांना सदर बाजार पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. आरोपींच्या ताब्यातील ४ तलवारी जप्त करण्यात आल्या. कादराबाद भाजी मंडई भागात २२ मे रोजी दुपारी घरात आई नसताना आरोपी सदर ठिकाणी आले आरोपी फारूक अंगविक्षेप करू लागला. तर त्याचा मित्र जुनैद अनिस बागवान याने असभ्य वर्तन केले. त्यांनी सदर बालिकेचा व तिच्या मोठ्या बहिणीचाही विनयभंग केला. निरीक्षक संतोष पाटील यांना ही माहिती कळताच त्यांनी पोउपनि किरण बिडवे व त्यांच्या सहकार्‍यांना घटनास्थळी पाठविले. बिडवे यांनी सर्वच आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातील ४ तलवारी , पाईप व इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी आरोपी फारूक हफीज पठाण (भाजी मंडई, कादराबाद), जुनैद अनिस बागवान, अफरोज हफीज पठाण, सलमान असलम बागवान, रिजवान असलम बागवान (कादराबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक के.एम. बिडवे, ए.एस.आय. पाटील, ठाकूर, जलाल शेख, नंदू खंदारे, संदीप कोकणे, श्रीनिवास गुडूर, प्रताप चव्हाण, जतीन ओहोळ आदींनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Five accused arrested in molestation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.