‘त्या’ प्रकरणातील पाच आरोपींना अटक
By Admin | Updated: September 10, 2014 00:00 IST2014-09-09T23:36:43+5:302014-09-10T00:00:03+5:30
परभणी : सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथे नरबळीचा प्रयत्न केल्या प्रकरणात पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी पाच आरोपींना अटक केली आहे.

‘त्या’ प्रकरणातील पाच आरोपींना अटक
परभणी : सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथे नरबळीचा प्रयत्न केल्या प्रकरणात पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी पाच आरोपींना अटक केली आहे.
शनिवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास डिघोळ येथे देवीच्या मंदिरात गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न केल्या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. देवी मंदिराजवळ रात्री पूजा सुरु असताना ग्रामस्थांना मंदिराजवळ बॅटरीचा प्रकाश दिसल्याने ग्रामस्थ त्या ठिकाणी आले होते. त्यामुळे आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता.
या प्रकरणात जादुटोणा अधिनियमान्वये गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधात पथके पाठविली होती. ९ सप्टेंबर रोजी भालचंद्र शिंदे, नरसिंग कावळे, राम ढबरे, मोईन नजीर शेख आणि बाबू उस्मान शेख या पाच जणांना पोलिसांनी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.
दक्षता अधिकाऱ्यांची नियुक्ती
नरबळी, अंधश्रद्धा व अघोरी प्रथेविरुद्ध तक्रारी नोंदविण्यासाठी पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात दक्षता अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.