मासेमारी करणारा तरुणाचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: April 15, 2017 23:48 IST2017-04-15T23:41:59+5:302017-04-15T23:48:08+5:30
आष्टी : परतूर तालुक्यातील परतवाडी येथील पाझर तलावावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूण पाण्यात बुडून मृत्यू झाला

मासेमारी करणारा तरुणाचा बुडून मृत्यू
आष्टी : परतूर तालुक्यातील परतवाडी येथील पाझर तलावावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूण पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता सदर तरूणाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलास यश आले.
परतवाडी येथील संजय मुरलीधर आढे (२५) हा शुक्रवारी मासेपकडण्यासाठी मेव्हणे नारायण राठोड याच्यासोबत गेला होता. मासे पकडण्याचा प्रयत्नात पाण्याचा अंदाज न आल्याने संजय बुडाला. ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर जालना येथील अग्निशमन दलाच्या जवांना दिवसभर शोध घेतला. मात्र संजय आढेचा शोध लागला नाही. अग्निशमन दलाच्या पथकात बी.एम.जाधव, सागर गडकरी, आर.के. बनसोडे, सत्तार पठाण, विठ्ठल कांबळे, सुरेंद्र पवार तसेच काही ग्रामस्थांनी शनिवारी दिवसभर संजय आढेचा मृतदेह शोधण्यासाठी तलाव परिसरात शोध कार्य केले.
शनिवारी सायंकाळी संजय आढेचा मृतदेह हाती लागला. या प्रकारने गावात हळहळ व्यक्त होत आहे.