तहसीलदारांचे दोनवेळा निलंबन होण्याची पहिलीच वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 23:16 IST2017-04-03T23:14:09+5:302017-04-03T23:16:38+5:30
भोकरदन : भोकरदनच्या तहसीलदार रूपा चिंत्रक यांना अवैध वाळू विक्रेत्यांशी केलेल्या जवळकीमुळे विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी निलंबित केले.

तहसीलदारांचे दोनवेळा निलंबन होण्याची पहिलीच वेळ
भोकरदन : भोकरदनच्या तहसीलदार रूपा चिंत्रक यांना अवैध वाळू विक्रेत्यांशी केलेल्या जवळकीमुळे विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी निलंबित केले. येथील तहसीलदार पद अद्याप रिक्तच आहे़ शिवाय एकाच तहसीलदारांचे दोन वेळा निलंबन होण्याची भोकरदन येथील ही पहिलीच घटना आहे़
भोकरदन तालुक्यातील एकाही वाळू पट्ट्याचा लिलाव झालेला नसताना अवैध वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू होती. ही बाब महसूल व पोलिस अधिकाऱ्यांना माहीत नाही अशातली बाब नाही.
मात्र त्यांच्यातच सहभागी होऊन सगळे मिळून गौण खनिज लुटू अशी वृत्ती महसूल व पोलिस खात्याच्या काही अधिकाऱ्यानी घेतल्यामुळे हा धंदा मोठ्या प्रमणात फोफावला
आहे .
केळणा, पूर्णा, जुई नद्यांचे पात्र वाळू उपसा केल्यामुळे ओसाड झाले आहे. तालुक्यात वाळूचा उपसा तर होतोच मात्र जालना व औरंगाबाद येथील वाहने मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करतात. त्यामुळे हसणाबाद पोलिस ठाण्याचा पदभार घेण्यासाठी मोठी स्पर्धा होते, शिवाय महसुल मंडळ, तलाठी सज्जे सुध्दा याच पध्दतीने घेण्यात येतात याला केवळ शासकीय यंत्रणाच जबाबदार आहे असे नाही तर अवैध धंद्याला राजकीय नेते सुध्दा अभय देतात.
सर्वच पक्षाचे कार्यक्रर्ते या गोरख धंद्यात उतरले आहेत महसुलचे अधिकारी, पोलिस कर्मचारी, पत्रकार, यांची सुध्दा या धंद्यामध्ये भागीदारी आहे. त्यामुळे कोणाी कोणाकडे बोट दाखवायचे नाही असाच प्रकार संध्या भोकरदन तालुक्यात सुरू आहे.
मात्र एकाच तहसिलदाराला भोकरदनमध्ये दोन वेळा निलंबित होण्याचा इतिहास मात्र भोकरदन तहसिलच्या नावावर लिहिला गेला आहे़ (वार्ताहर)