स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटीचे दर्शन

By Admin | Updated: June 26, 2016 00:39 IST2016-06-26T00:13:58+5:302016-06-26T00:39:33+5:30

घाटनांद्रा : पेंडगावच्या (ता. सिल्लोड) गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात एसटीचे दर्शन झाल्याने पेडगाववासीयांनी आनंद व्यक्त केला .

For the first time after the independence, ST's philosophy | स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटीचे दर्शन

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटीचे दर्शन


घाटनांद्रा : पेंडगावच्या (ता. सिल्लोड) गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात एसटीचे दर्शन झाल्याने पेडगाववासीयांनी आनंद व्यक्त केला .
सिल्लोड- घाटनांद्रा या मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पेडगाव येथे महामंडळाची एसटी बस जात नव्हती. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थी व ग्रामस्थांना पायपीट करावी लागत होती. याची दखल घेऊन सरपंच रमेश पारखे, उपसरपंच काशीनाथ अंभोरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिरंग सुस्ते यांनी पुढाकार घेऊन एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना साकडे घालून पेडगाव येथे बस सुरू करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन आगार प्रमुख समर्थ शेळके यांनी पेडगाव ते सिल्लोड बस सकाळी ८.३० वाजता सुरू करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावामधे एसटी बस आल्याने गावकऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
पहिल्या दिवशी गावामध्ये आलेल्या बसचे गावकऱ्यांनी वाजतगाजत स्वागत केले. यावेळी वाहक सपकाळ, चालक गावंडे यांचा सत्कार करून एसटी महामंडळाचे आभार मानले.
या बसमुळे आमठाणा, तळणी, भराडी व सिल्लोड येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या ६० ते ७० विद्यार्थ्यांची मोठी सोय झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी ग्रा.पं.स. नामदेव सुस्ते, शालेय अध्यक्ष धनराज शितळकर, श्रीरंग शितळकर, राजू हिंगमिरे, रमेश दगड, ईश्वर पारखे, बाबूराव अंभोरे यांची उपस्थिती होती.

Web Title: For the first time after the independence, ST's philosophy