पहिली असताना दुसरीसोबत घरोबा !
By Admin | Updated: May 24, 2014 01:37 IST2014-05-24T01:32:07+5:302014-05-24T01:37:58+5:30
लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव माहेर असलेल्या पहिल्या पत्नीला मुलगी झाल्यामुळे दुसरे लग्न करून पहिल्या पत्नीला नांदविण्यास नकार देत मारहाण केल्याची घटना

पहिली असताना दुसरीसोबत घरोबा !
लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव माहेर असलेल्या पहिल्या पत्नीला मुलगी झाल्यामुळे दुसरे लग्न करून पहिल्या पत्नीला नांदविण्यास नकार देत मारहाण केल्याची घटना बार्शी तालुक्यातील चेरा येथे घडली आहे. याबाबत रेणापूर पोलिस ठाण्यात पतीसह सहा जणांविरूध्द गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील माहेर असलेल्या मायादेवी महेश सूर्यवंशी यांचा विवाह बार्शी तालुक्यातील चेरा येथील महेश दत्तात्रय सूर्यवंशी यांच्याशी झाला होता. लग्नानंतर मायादेवी यांना काही दिवस चांगले नांदविले. पण त्यांना दरम्यानच्या काळात मुलगी झाली. मात्र महेश सूर्यवंशी यांना मुलगी नको होती. त्यामुळे चिडलेल्या महेश सूर्यवंशी यांनी मायादेवी यांना जाच सुरू केला. नोकरीसाठी माहेरहून ५ लाख रूपये घेऊन ये म्हणून मारहाण केली. तसेच उपाशीपोटी ठेवून नांदविण्यास नकार दिला आणि मायादेवी यांच्या संमतीविना दुसरे लग्न केले. सासरी आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद मायादेवी सूर्यवंशी यांनी रेणापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पती महेश सूर्यवंशी यांच्यासह सासरच्या अन्य सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या सहाजणांमध्ये दुसर्या पत्नीचाही समावेश आहे. प्रकरणाचा पुढील तपास फौजदार पवार करीत आहेत. (प्रतिनिधी)विवाहानंतर चांगले नांदविले. पण मुलगी झाल्यानंतर जाच सुरू केला माहेरहून पैसे आणण्याची मागणीही सासरच्यांनी केली नांंदायला आल्यास जिवे मारू, अशी धमकीही दिली