शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कर्फ्यूच्या पहिल्याच रात्री डॉक्टरांचं घर फोडलं; १०० तोळे सोनं, १० लाखाची रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 13:49 IST

Robbery in Pratap Nagar Aurangabad डॉ.सुषमा सोनी (रा.प्रतापनगर, उस्मानपुरा) आणि त्यांचे पती जयंत सोनी हे ८ दिवसापूर्वी परिवारासह देवदर्शनासाठी परराज्यात गेले आहेत.

ठळक मुद्देधाडसी चोरीने पोलिसांच्या रात्र गस्तीवर  प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. बंद घर असल्याची संधी साधत चोरट्यानी घराला लक्ष केले.

औरंगाबाद: शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्याच्या पहिल्याच रात्री डॉक्टराचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी घरातील १०० तोळे सोने आणि दहा लाख रुपये रोख असा सुमारे 50 ते 70 लाखांचा मुद्देमाल चोरल्याची घटना आज सकाळी शहरातील प्रताप नगर भागात उघडकीस आली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धाडसी चोरीने पोलिसांच्या रात्र गस्तीवर  प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

डॉ.सुषमा सोनी (रा.प्रतापनगर, उस्मानपुरा) आणि त्यांचे पती जयंत सोनी हे ८ दिवसापूर्वी परिवारासह देवदर्शनासाठी परराज्यात गेले आहेत. बंद घर असल्याची संधी साधत चोरट्यानी घराला लक्ष केले. घराचा समोरील दरवाजा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. यानंतर घरामध्ये ठेवलेले सुमारे १००  तोळे सोन्याचे दागिने व रोख १० लाख रुपये असे सुमारे 60 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे. आज सकाळी सोनी कुटुंबाचा नोकर अंगणातील झाडांना पाणी घालण्यासाठी आणि साफसफाई साठी आले तेंव्हा हा सर्व प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता,उपयुक्त निकेश खाटमोडे, उपयुक्त दीपक गिरऱ्हे  सह गुन्हेशाखा आणि अन्य पोलीस ठाण्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी घटनस्थळी दाखल झाले आहेत...

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद