संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात पालिका प्रथम
By Admin | Updated: November 5, 2014 00:57 IST2014-11-05T00:22:52+5:302014-11-05T00:57:22+5:30
जालना : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात जालना नगरपालिकेला मराठवाडा विभागातून सर्वप्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात पालिका प्रथम
जालना : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात जालना नगरपालिकेला मराठवाडा विभागातून सर्वप्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी ३० आॅक्टोबर रोजी औरंगाबाद येथे ही घोषणा केली. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांना पुष्पगुच्छ देऊन आयुक्तांनी त्यांचे स्वागत केले. मराठवाड्यात मागील काही महिन्यांपूर्वी ‘अ’ वर्ग दर्जाच्या नगरपालिकांमध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.
याप्रसंगी उपायुक्त विजयकुमार फड यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी शहरात स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे पथक जालन्यात दाखल झाले होते. त्यावेळी उपनगराध्यक्ष शाह आलमखान यांनी विविध भागात पालिकेच्या स्वच्छतेची कामे दाखविली होती. (प्रतिनिधी)