महापौरांची पहिली सर्वसाधारण सभा

By Admin | Updated: June 18, 2016 00:57 IST2016-06-18T00:47:37+5:302016-06-18T00:57:14+5:30

लातूर : काल परवा सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्या बाकावर बसून महापौर, आयुक्तांना कैचित पकडणारे अ‍ॅड़दीपक सूळ आता महापौरांच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत़

First General Assembly of Mayor | महापौरांची पहिली सर्वसाधारण सभा

महापौरांची पहिली सर्वसाधारण सभा


लातूर : काल परवा सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्या बाकावर बसून महापौर, आयुक्तांना कैचित पकडणारे अ‍ॅड़दीपक सूळ आता महापौरांच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत़ त्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेली पहिलीच सर्वसाधारण सभा शनिवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात ११ वाजता होत आहे़ आता ते आपल्या सहकारी नगरसेवकांच्या कैचित सापडतात की, प्रत्युत्तर देऊन त्यांनाच कैचित धरतात हे आज सभागृहात पहायला मिळणार आहे़
सर्वसाधारण सभेत एकूण मागील इतिवृत्तासह १९ विषय चर्चा व मान्यतेसाठी घेतले असून, विलासराव देशमुख यांचा नाना- नानी पार्क किंवा आजी आजोबा पार्कमध्ये पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या खर्चास मान्यता देणे हा विषय विषय पत्रिकेवर प्राधान्याने घेतला आहे़ शहराच्या विविध भागात मोठ्या नाल्यावर झाकण बसविणे, रस्ते करणे, वरंवटी खत प्रकल्पाच्या जागेवर बगीचा विकसीत करणे व संरक्षण भिंत बांधणे यावरही सभेत चर्चा होणार आहे़ सम्राट चौक ते गांधी चौक या रस्त्याचे २़१६ कोटी रुपयांचे अनुदान विविध चौकातील सुशोभिकरणासाठी वर्ग करणे, लातूर शहर हद्दीमध्ये महावीर स्तंभ उभा करण्यासाठी खर्चास मान्यता देणे, शहरातील ग्रीन बेल्ट विकसीत करणे, वरवंटी कचरा डेपो येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा मागविणे, नळांना मिटर बसविणे आदी विषयांवर या सभेत चर्चा होणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: First General Assembly of Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.