विद्यापीठस्तरावर देशातील पहिला डिजिटल स्टुडिओ
By Admin | Updated: August 11, 2014 01:57 IST2014-08-11T01:47:34+5:302014-08-11T01:57:30+5:30
विजय सरवदे, औरंगाबाद देशातील नामांकित विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दर्जेदार शैक्षणिक सुविधा, उच्च व जागतिक पातळीवरील अभ्यासक्रम

विद्यापीठस्तरावर देशातील पहिला डिजिटल स्टुडिओ
विजय सरवदे, औरंगाबाद
देशातील नामांकित विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दर्जेदार शैक्षणिक सुविधा, उच्च व जागतिक पातळीवरील अभ्यासक्रम व कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्मितीचा वसा घेतला आहे. स्वतंत्र इमारतीमध्ये वृत्तपत्रविद्या विभागाचा साडेआठ कोटी रुपयांचा ‘डिजिटल स्टुडिओ’ आकाराला येत असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. या विभागाला २३ आॅगस्ट रोजी ४० वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्वभूमीवर मल्टिमीडिया लॅबचे कामही पूर्ण झालेले आहे.
विद्यापीठातील ‘डिजिटल लॅब व मल्टिमीडिया लॅब’विषयी वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले की, देशातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेने आपल्या विद्यापीठात जागतिक पातळीवरील सर्वोत्तम ‘डिजिटल लॅब’ उभारण्यासाठी सन २००० पासून प्रयत्न सुरू झाले होते. वृत्तपत्र विभागात टेलिव्हिजन, रेडिओ, अॅनिमेशन, फिल्मचे संपादन करण्याची सुविधा असावी, हाय डेफिनेशन फिल्म तयार करता यावी, विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रांमध्ये पानांची मांडणी कशी केली जाते, त्याचे संपादन, सजावट, जाहिरात मांडणी आदींचे कौशल्य शिकता यावे, यासाठी ‘मल्टिमीडिया लॅब व डिजिटल स्डुडिओची कल्पना पुढे आली. त्यादृष्टीने सन २००० मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. के. पी. सोनवणे यांच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर सन २००६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक झाली.
मल्टिमीडिया लॅबमध्ये सर्व अॅपल संगणक बसविण्यात आली आहेत. या लॅबमध्ये एकूण २६ संगणकांचा समावेश असून फिल्म एडिटिंग, टेलिव्हिजन एडिटिंग, रेडिओ एडिटिंग, अॅनिमेशन, न्यूज- इमेज अँड ग्राफिक्सच्या प्रात्यक्षिकांसाठी जगातील अत्याधुनिक लायन्सयुक्त प्रोफेशनल सॉफ्टवेअर खरेदी करण्यात आलेली आहेत.
४विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अॅपल कंपनीने प्रशिक्षित केलेले तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. विशेष म्हणजे, या लॅबमध्ये ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची उच्चतम सुविधा निर्माण केली असून त्याद्वारे वृत्तपत्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जगातील ख्यातनाम प्राध्यापकांचे लाईव्ह व्याख्यान बघता व ऐकता येईल.