पहिल्या दिवशी ४ रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:09+5:302020-12-17T04:30:09+5:30

औरंगाबाद : दुभंगलेली टाळू, ओठावर रक्ताची गाठ, जिभेला गाठ असलेल्या ४ रुग्णांच्या चेहऱ्यावर सोमवारी हास्य फुलले. डॉ. शरदकुमार ...

On the first day, a smile appeared on the faces of 4 patients | पहिल्या दिवशी ४ रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

पहिल्या दिवशी ४ रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

औरंगाबाद : दुभंगलेली टाळू, ओठावर रक्ताची गाठ, जिभेला गाठ असलेल्या ४ रुग्णांच्या चेहऱ्यावर सोमवारी हास्य फुलले. डॉ. शरदकुमार दीक्षित स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ४५ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात पहिल्या दिवशी ४ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यंदा कोविड प्रादुर्भावाचे संकट उभे राहिले. तरीही रुग्णसेवेच्या या महायज्ञात खंड पडू न देता क्लबने हे सेवाकार्य सुरूच ठेवले आहे. केवळ खबरदारी म्हणून गतवर्षीच्या तुलनेत हे शिबिर मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. डॉ. उज्ज्वला दहीफळे यांनी रविवारी ५७ रुग्णांची तपासणी केली. यातील ३५ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. ३० डिसेंबरपर्यंत हे शिबिर चालणार असून, रोज ४ ते ५ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी पहिल्या दिवशी ४ शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. उज्ज्वला दहीफळे यांनी सांगितले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लब चिकलठाणाचे अध्यक्ष संजीव गुप्ता, सचिव विनोद चौधरी, माजी अध्यक्ष राजेश भारुका, जी. एम. बोथरा, प्रकाश गोठी, राजेश लहुरीकर, गजानन झालवार आदी प्रयत्नशील आहेत. औरंगाबाद ड्रगिस्ट व केमिस्ट असोसिएशनतर्फे मोफत औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: On the first day, a smile appeared on the faces of 4 patients