पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला कुलूप
By Admin | Updated: June 16, 2015 00:47 IST2015-06-16T00:34:35+5:302015-06-16T00:47:58+5:30
लोणगाव : आठवीचा वर्ग वाढवावा, या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथे शाळेला पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी कुलूप ठोकले.

पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला कुलूप
लोणगाव : आठवीचा वर्ग वाढवावा, या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथे शाळेला पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी कुलूप ठोकले.
लोणगाव येथील जि.प. शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. पुढील वर्गासाठी २०१४-१५ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु तो मंजूर झाला नाही. त्यामुळे बरेच मुले पुढील शिक्षण घेण्यापासून वंचित राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य आणि शालेय व्यवस्थापन समितीने जोपर्यंत नवीन वर्ग होत नाही, तोपर्यंत बंद केलेली शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयीची पूर्वसुचना गटशिक्षणाधिकारी भोकरदन यांना देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. (वार्ताहर)