पहिल्या दिवशी ९०० विद्यार्थांनी दिली सीए परीक्षा

By | Updated: November 22, 2020 09:01 IST2020-11-22T09:01:32+5:302020-11-22T09:01:32+5:30

शहरात ५ केंद्रांवर विद्यार्थ्यांची परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा १४ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वीही परीक्षा मे २०२० ...

On the first day, 900 students took the CA exam | पहिल्या दिवशी ९०० विद्यार्थांनी दिली सीए परीक्षा

पहिल्या दिवशी ९०० विद्यार्थांनी दिली सीए परीक्षा

शहरात ५ केंद्रांवर विद्यार्थ्यांची परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा १४ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वीही परीक्षा मे २०२० मध्ये होणार होती; पण कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर २१ नोव्हेंबरपासून परीक्षा घेण्याचा निर्णय संस्थेने घेतला. आजपासून परीक्षा सुरळीत सुरू झाली.

पोलीस संरक्षणात परीक्षा घेण्यात येत आहे.

यासंदर्भात आयसीएआयच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष सीए गणेश शीलवंत यांनी सांगितले की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून आसन व्यवस्था केली आहे. परीक्षा केंद्राचे सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. परीक्षार्थ्यांची थर्मलगनने तापमान तपासणी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: On the first day, 900 students took the CA exam