पहिला दिवस निरंक...!
By Admin | Updated: January 28, 2017 00:44 IST2017-01-28T00:42:00+5:302017-01-28T00:44:31+5:30
उस्मानाबाद : पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

पहिला दिवस निरंक...!
उस्मानाबाद : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांकडून शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. इच्छुकांना १ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ५५ आणि पंचायत समितीच्या ११० जागासाठी निवडणूक होत आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडे एकेका जागेसाठी इच्छुकांची संख्या अधिक असलेल्याने त्यांच्या मुलखती घेण्यात येत असून जवळपास सर्वच पक्षांनी मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणचे उमेदवारही निश्चित झाले आहेत. परंतु, बंडखोरीचा संभाव्य धोका ओळखून अद्याप उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. दरम्यान, २७ जानेवारीपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली असून पहिल्या दिवशी आठ तालुक्यातून एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्जदाखल केलेला नाही. १ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. संभाव्य अपीलावर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येईल. अपील न झाल्यास ७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. आणि अपील झाल्यास अर्ज मागे घेण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदत असेल. त्याचप्रमाणे १० फेब्रुवारी रोजीच मतदार केद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येईल. तर २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. (प्रतिनिधी)