शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

आधी अतिवृष्टीमुळे नुकसान आता ई - केवायसीचा फटका; १५ हजार शेतकरी मदतीपासून दूर

By विकास राऊत | Updated: October 4, 2023 12:48 IST

मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानभरपाईपोटी निधी जाहीर केला. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेद्वारे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या प्रक्रियेमुळे ई-केवायसी वेळेत पूर्ण न करू शकलेले १५ हजार शेतकरी मदतीपासून दूर राहिले आहेत. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा तालुक्यात सुमारे एक हजारपर्यंत आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शिल्लक राहिलेले पीकही वाया गेले. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसानभरपाईपोटी शासनाने मराठवाड्यासाठी २ हजार ७०० कोटींची मदत दिली. यात जिल्ह्याला ४०० कोटींची रक्कम पहिल्या टप्प्यात होती. पहिल्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर गेली; मात्र त्यानंतरची मदत ऑनलाइन खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या खातेनिहाय याद्या अपलोड करून त्या तहसीलदारांकडून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून प्रमाणित केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत गेले. यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते ई-केवायसी, आधार लिंक करणे गरजेचे होते.

ई-केवायसीमुळे मदत जमा झाली नसेल...सततच्या पावसाची मदत जास्त होती. शासनाच्या सूचनेप्रमाणे खालील स्तरावरून नियमित झालेल्या यादीला मंजुरी दिल्यानंतर मंत्रालयातून रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली गेली. जिल्ह्यात १२ ते १५ हजार शेतकऱ्यांपेक्षा जास्त जणांच्या खात्यावर मदत गेलेली नसेल. सामायिक खाते, जमिनीचा वाद या व इतर कारणांमुळे ई-केवायसीच्या अडचणी आल्या असतील. त्यामुळे मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नसेल.-- जनार्दन, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी